Breaking News

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी उत्पादनावर बंदी घाला

छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे तहसीलदारांना निवेदन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

             संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- मागील अनेक दिवसांपासून धूम्रपान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बिडी बंडलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरून विटंबना करण्यात येत आहे ही विटंबना तात्काळ थांबवून सदरील कंपनीवर बंदी घालण्याची मागणी दिनांक 10 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आहेत त्यांच्या युध्दनीती, लेखन,कर्तव्यदक्षता त्याग या गुणांची किर्ती साऱ्या जगात पसरली आहे पण त्यांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्याच नावाने धुम्रपान उत्पादन गेले ७०ते ८० वर्षे केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र महान असल्याने त्यांच्या नावाचा फायदा घेऊन संभाजी बिडी या नावाने सांबळे आणि वाघीरे कंपनी तर्फे धुम्रपान साहित्याचे उत्पादन केले जात आहे धुम्रपान आरोग्यास अपायकारक तर आहेच पण बिडीच्या पाकिटा वरील महाराजांचा फोटो फाडुन फेकला जातो यात सरळसरळ महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि महापुरुषाची विटंबना केली जात आहे, यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात आहेत म्हणून बिडीच्या विक्रीवर बंदी आणावी व बिडी बंडल वरील संभाजी नांव काढण्यात यावे

यासाठी विविध संघटना कडून अनेक वर्ष पाठपुरावा करून सुद्धा उत्पादकाकडून कारवाई होत नाही आणि सदर प्रकारची प्रशासनाने दखल घेऊन लवकर हे नाव न काढल्यास समस्त शिव-शंभूप्रेमी आणि छत्रपती संभाजी महाराज सेवा च्यावतीने राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यानिवेदनावर जिल्हा अध्यक्ष दामोदर नवले पाटिल संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर,बाळासाहेब काजळे,रोशन चव्हाण,भागवत चव्हाण,पिंटू रोकडे,सुनील माने,अंकुश शिखोरे,स्वप्नील मगर,विष्णू नवले,बालाजी चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close