*शिक्षकांनी काळानुरूप बदलले पाहिजे,पुरस्काराने ऊर्जा मिळते – *श्रवणदत्त*
*महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या वतीने शिक्षकांचा राज्य आदर्श पुरस्कार देऊन गौरव !*

संपादक :- कंबरसिद्दीकी
*जिंतूर- कोरोना महामारीच्या काळात शिक्षक बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून *चेक पोस्टवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर आणि पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर काम केले , क्वारंटाइन सेंटरला काम केले ,आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर गावाच्या सर्वे मध्ये घरोघरी जाऊन सहभाग नोंदवला ,संकटकाळी घरोघरी जाऊन किराणा मालाचे सुद्धा वाटप केले.**
*ते करत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ,ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुद्धा चालू ठेवलं.*
*हे सर्व करत असताना ज्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा सन्मान झाला. तसाच आमच्या शिक्षक बांधवांचा सुद्धा सन्मान व्हावा, त्यांनी केलेले काम दुर्लक्षित होता कामा नये,म्हणून त्यांचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने राज्य आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.*
*राज्य आदर्श पुरस्कार,*
भोगाव (देवी)येथे वितरित करण्यात आले.
*माजी आमदार,गुलाबचंद राठी,उपविभागीय पोलीस अधिकारी (IPS)श्रवण दत्त,कवी अण्णा जगताप, यांच्या हस्ते,श्रीमती सुनंदा जाधव,नीता आव्हाड,शारदा पाटील,भास्कर दराडे,मोहन जाधव,गजानन काळे,इकबाल शेख,विष्णू शिंदे,बिभीषण राठोड,दिलीप साकळकर,नवसाजी श्रावणे आदीना पुरस्कार प्रदान करण्यात आले.*
*याप्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांनी शिक्षकांनी काळानुरूप बदलले पाहिजे,स्वतःला समृद्ध केले पाहिजे,शिक्षणातील नवीन आवाहाने स्वीकारली पाहिजे ,असे आवाहन करून पुरस्काराणे ऊर्जा मिळते असे सांगितले.*
*यावेळी संघटनेचे जेष्ठ नेते देवी संस्थानचे पदाधिकारी रवी मोरे,रितेश पांडे, के.सी.घुगे,प्रसाद मोरे,जिल्हा पदाधिकारी कैलास कपाळे, दत्तराव पोले,तालुका पदाधिकारी सोपान खताळ,शिवाजी दराडे,परमेश्वर मेनकुदळे,गजानन काळे,डी.जी चौधरी,मधुकर लोडे, इतर पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*पुरस्कार वितरण कार्येक्रमानंतर येथील पर्यटनस्थळावर पुरस्कारप्राप्त व इतर शिक्षकांनी वृक्षारोपण केले.*