Breaking News

“परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्षा यांची नियुक्ती व सत्कार संभारंभ संपन्न” *युवती नी प्रत्येक क्षेत्रात सक्षम व्हाव्हे – कु.प्रेक्षा विजय भांबळे”

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

      संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी:- दी.16/9/20 परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्षा यांची नियुक्ती व सत्कार संभारंभ कु.प्रेक्षा विजय भांबळे ( जिल्हा अध्यक्षा युवती परभणी.) यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन, वसमत रोड परभणी येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षां पदी सौ.भावनाताई नखाते.तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अजय चौधरी, (जिल्हा उपाध्यक्ष परभणी) रामराव उबाळे,( सभापती,परभणी) नंदाताई राठोड,( जिल्हा अध्यक्ष महिला परभणी राष्ट्रवादी.)
मुमताज शेख, प्रतिभा हरभरे, मेमुना शेख, निर्मला ताई लिपणे, मधुकर भवाळे, दत्तराव माईंदळे, सुमंत वाघ, दीपक मिटकरी, इ.च्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम सम्पन्न झाला.
यावेळी युवती तालुकाध्यक्षा म्हणून पुष्पा उबाळे (जिंतूर,) किरण भिसे (पाथरी), ज्योती भालेराव (सेलू) सुप्रिया राजभोसले (गंगाखेड,) , श्रद्धा भोसले (सोनपेठ) , वैष्णवी मठपती (पूर्णा) तालुका कार्याध्यक्षा म्हणून सेलू येथे रुपाली सावंत, जिंतूर येथे अश्विनी भवाळे, तर सेलू शहर अध्यक्षा वैष्णवी लिपणे यांचा नियुक्ती पत्र, शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती व सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कु.प्रेक्षा विजय भांबळे जिल्हाध्यक्षा युवती यांनी छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचार श्रेणी तसेच राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा मा.शरद पवार साहेब, मा.अजितदादा पवार साहेब, सौ.सुप्रियाताई सुळे, सक्षणा ताई सलगर यांची राष्ट्रवादी तळागाळात पोहचवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला.
तर सौ.भवनताई नखाते यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व युवतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कधीही माघे हटणार नाहीत असा विश्वास दिला.
कार्यक्रम ठिकाणी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस चे वक्ता सेल अध्यक्ष संदीप माटेगावकर यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close