Breaking News

*जिंतूर व्यापारी महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी शकील अहेमद यांची नियुक्ती*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- तालुका व्यापारी महासंघाच्या कार्यकारणीची बैठक दि.27 सप्टेंबर रविवार रोजी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी कोरकमेटीच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेख शकील यांना प्रसिद्ध प्रमुखपदासाठी प्रस्ताव ठेवला असता त्यास सचिव राजू देवकर यांनी अनुमोदन दिले नंतर सर्व कार्यकारिणीने देखील यास पाठींबा दर्शविल्यानंतर सर्वानुमतीने अध्यक्ष रमेश दरगड यांनी जिंतूर तालुका व्यापारी महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी हे इलेक्ट्रिक व्यापारी तथा पत्रकार शकील अहेमद उर्फ बबलू यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.त्यांच्या या निवडी बद्दल जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल व अध्यक्ष रमेश दरगड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीला उपाध्यक्ष प्रदिप कोकडवार, गणेश कुरे, सचिव राजू देवकर,कोषाध्यक्ष सत्यनारायण शर्मा, संघटक संजय कोकडवार, सहकोषाध्यक्ष सुधीर शहाणे, संतोष देशमुख, बंडू पल्लेवार, सुभाष देशपांडे, प्रकाश सोनी, हरीश मुंदडा, बालाजी सांगळे, हाजी शेख युसुफ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close