Breaking News

वस्सा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

वस्सा – जिंतूर तालूक्यातील वस्सा येथिल म.फुले विद्यालय व समता रक्तदाता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी
दि.1 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी ठिक 9:00 वा फिजीकल डिस्टसिंगचे पालन करुन भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन येथिल म.फुले विद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. कोरोना कालावधीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन परिसरातील सर्व इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करावे व आपली सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन प्राचार्य मच्छिंद्र लुटे, मुख्याध्यापक भास्कर दराडे, समता रक्तदाता संघाचे सुभाष मांडे, तान्हाजी काळे व कृष्णा राऊत यांनी केले आहे. गत 20 रवर्षांपासून म.फुले विद्यालयाचा सामाजिक बांधिलकी जपणारा भव्य रक्तदान शिबीराचा हा सामाजिक उपक्रम अव्याहत सुरु आहे. हे विशेष ! परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाची या प्रसंगी उपस्थिती राहणार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close