Breaking News

मनिषा वाल्मिकी वर बलात्कार करून हत्या करणाऱ्यां आरोपींना फाशी द्या- दत्ता वाकसे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

.          संपादक :- अकबर सिद्दीकी

बीड/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका खेड्यात दलित समाजातील मनिषा वाल्मिकी वर उच्च वर्णीयातील काही गुंडांनी सामुहिक बलात्कार करून तीची हत्या केल्या प्रकरणात आरोपींचा खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी
धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी यांनी १आक्टोंबर गुरुवार रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

या संदर्भात वाकसे पुढे म्हणाले की, सदर मुलगी हि तीच्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेली असताना दुष्टहेतूने पाळत ठेवून बसलेल्या नराधमांनी तीच्यावर सामुहिक बलात्कार केला आणि अमानुष पणे तीची हाडे मोडून जीभकापली व गळादाबुन जीवे मारण्याचे कृत्य केले. यासर्व दुषकृत्याचा धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करुन प्रकरणातील सर्व आरोपीं विरोधात सक्षम गुन्हे दाखल करून तो खटला फास्टट्रँक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close