Breaking News

वस्सा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न. 55 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

         संपादक :- अकबर सिद्दीकी

वस्सा :- जिंतूर तालूक्यातील वस्सा येथे दि. 1 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्याला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. वस्सा येथिल म.फुले विद्यालयाच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन म.फुले विद्यालय वस्सा व समता रक्तदाता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. गत 20 वर्षा पासून म.फुले विद्यालयाचा हा सामाजिक उपक्रम अव्याहत सुरु आहे. हे विशेष ! रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा म.फुले विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी झालेल्या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मच्छिंद्र लुटे हे होते. सरपंच रामभाऊ राऊत, जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथिल रक्तसंक्रमन अधिकारी डॉ एम. आर. आंबेकर, निशा वाकुळे , प्रितम मेंटेवाड ,प्रषिक येळनुरकर ,मारोती शिरगणवार .महेश साळगुंडे, म.फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राऊत ,मुख्याध्यापक भास्कर दराडे कृष्णा राऊत आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन तान्हाजी काळे यांनी केले तर सुभाष मांडे यांनी आभार मानले. रमेश क्षीरसागर, लक्ष्मण बकरे, बापूराव सोनवणे, रमेश वाघे, वसंत देशमुख, कुमार विभूते आदिंनी यशस्वीते करीता परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close