Breaking News

ऊस तोड कामगार मुकादम यांचे प्रश्न मार्गे लावल्याशिवाय शांत बसणार नाही *आमदार सुरेश धस*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :-  जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालय येथे दिनांक 3 अक्टोबर रोजी सकाळी 9:00 वाजता स्व.गोपिनाथराव मुंडे साहेब जिंतूर व सेलू तालुक्यातील ऊसतोड कामगार मुकादम, वाहतूक संघटना व श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऊस तोडणी मजूर वाढ, मुकादम कमीशन वाढ, वाहतूक दरवाढ, मजूर विमा , कारखाना किंवा शासन यांनी भरावा , कोरोना आणि तत्सम रोगां पासुन वाचण्यासाठी आरोग्य विमा,कारखान्याचे फायनल मिळावे या मागण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार सुरेश आण्णा धस यांनी केले
जिंतूर येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने ऊस तोड कामगार मुकादम यांच्या चर्चासत्राचे आयोजन माऊली मंगल कार्यालयात केले होते. ह्या कार्यक्रम प्रसंगी ऊस तोड कामगार व मुकादम यांचे जे जे प्रश्न आहेत जसे मजुर वाढ, वाहतूक दरवाढ, मुकादम कमिशन वाढ, मजूर विमा ह्या सर्व गोष्टी कारखान्यास करणे भाग पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. यासाठी आपल्या सहकार्याची ची अपेक्षा ठेवून तुमच्या सोबत चर्चा करण्यास आलो आहे.असे आ.सुरेश धस म्हणाले
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिंतूर सेलू मतदार संघात खूपच संख्येने लोक ऊस तोडणी ला जातात हे सर्व निश्चित तुमच्या पाठीशी राहतील वेळप्रसंगी आंदोलनात ही सहभागी होतील फक्त यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे.असे आवाहन केले
कार्यक्रमा प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे ,जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर पंडित दराडे ,भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सखाराम राठोड, कैलास महाराज, दत्तात्रय कटारे सुमेध सूर्यवंशी, अमोल देशमुख माधव दराडे ,प्रवीण कांदे, संतोष राठोड ,विकास जाधव, प्रवीण कांदे ,सचिन राठोड व परिसरातील बहुसंख्येने मुकादम उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close