त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी …. अविनाश हानवते

संपादक :- अकबर सिद्दीकी
पालम बातमीदार
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर बलात्कार करून जिवे मारणाऱ्या नराधमाना फाशी द्यावी अशा मागणीचे निवेदन बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश हनवते यांनी दि. 15 रोजी तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील माणुसकीला काळीमा फासणारी दुर्देवी घटना घडली आहे घडलेल्या घटनेत एका मुलीवर बलात्कार करत जीवे मारणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी. सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टामार्फत चालून त्या आरोपीला फासावर लटकावे अशा मागणीचे निवेदन बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश हनवते यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे या निवेदनावर
अरविंद थिटे कैलास झुंजारे. भीमराव रायबोले विजय वाघमारे अमृत साबणे. मंगेश धनसडे. उद्धव मोडके. दत्तात्रेय गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत