Breaking News

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही” तहसिलदार गोरे”

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी

पालम

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याचे प्रतिपादन नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी दि 8 रोजी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रसंगी बोलताना व्यक्त केली

यावेळी ना. तहसीलदार प्रकाश गायकवाड. प्रकाश बोराडे. मंडळाधिकारी मुरकुटे. वैजनाथ फड. भारत घनसावंत आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना गोरे म्हणाले की तालुक्यात मागील काही दिवसापासून पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम ही संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहेत सुरू असलेल्या कामात कोणी हलगर्जीपणा केल्यास यापुढे खपवून घेतली जाणार नसून तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांचे कामे तत्परतेने करत त्यांना सहकार्य करावे असेही त्यांनी या बैठकीत संबंधित कर्मचाऱ्याला सांगण्यात आले यावेळी कार्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पालम पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार माधवराव गायकवाड. पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारोती नाईकवाडे. शांतीलाल शर्मा. मोतीरामजी शिंदे. धोंडीराम कळंबे.राहुल गायकवाड. लक्ष्मण दुधाटे. भगवान करंजे अरुणा शर्मा. बाबासाहेब एगंडे. आदींची उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close