Breaking News

नवरात्रा निमित्ताने 9 फळझाडांची लागवड…

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :-   भोगावदेवीपर्यटनस्थळावर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाच्या हस्ते नऊ दिवसाची नऊ फळझाडे लावून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. जिंतुर तालुक्यातील भोगाव देवी येथे मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रातील पहिली शेतकरी उपयोगी फळबाग लोकसह भागातून उभी केली जात आहे. देवस्थानच्या सत्तर एकर जागे वर फक्त दीर्घकाळ टिकणारे फळझाडे लावली जातात. दर रविवारी येथे वृक्षप्रेमी जमा होतात. फळझाडे लागवड व झाडांचे संगोपन करतात. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने नऊ झाडे लावावीत असे आवाहन करण्यात आले होते. मानवत, परभणी, वसमत, हिंगोली, जिंतुर वरून 40 कुटुंब सहभागी झाले.. प्रत्येक कुटुंबाने नऊ फळझाडे लावून आई जगदंबेला हिरवा शालू नेसवला. सणाला निसर्गाची साथ देऊन एक वेगळाच पायंडा भोगावदेवीपर्यटनस्थळाच्या वतीने पाडला जात आहे. देवीला दर्शनाला आल्या नंतर झाड लावून संगोपन करन्याची श्रद्धा प्रत्येक भाविकात वाढावी. देवीचा परिसर हिरवागार व्हावा. हा मानस समितीचा आहे. या वेळी शिवसांभ सोनटक्के व सौ. गंगाबाई सोनटक्के यांच्या हस्ते वृक्षलागवड करून उद्घाटन करण्यात आले. दुपारी वन भोजन व 400 फळझाडांची लागवड करण्यात आली.यावेळी शितल सोनटक्के, नीता जगताप, किरण जाधव, प्रियंका देशमुख , सुरेखा जोशी, अर्चना चाफे कानडे, कऱ्हाळे मॅडम, सावन्त मॅडम, रोहिणी, नम्रता, अश्विनी, शर्मिला, सामाले, राजुरे, डाढाले, कोरडे, गोकर्णा, ऐश्वर्या, दुधाळकर, रुपाली, अंबुरे, अणेराव, रत्नपारखी, रोकडे, प्रियांका, रणखांबे, राही, कांचन, अवचार, मंगलबाई, शांताबाई अवचार रवि देशमुख, प्रा. किरण सोनटक्के, आन्ना जगताप, विनायक जाधव, प्रा. बाळू बुधवंत, के. सी घुगे, बालासाहेब राऊत, चित्रकार शिवराज जगताप ,अमोल सोनटक्के, बाळासाहेब देशमुखप्रा चाफे, प्रा सूर्यवंशी, खपरले एन पी. प्रा कदम पी व्ही, विशाल पोले, धनराज राजुरे, नवनाथ सोनटक्के, शेळके डी एस, पवार ओ एच, झाडें सर, अमोल राठोड, शिवाजी तिळवे, शरद नीलवर्ण, बोराडे सर, कनाकापुरे, प्रविण शेळके, उद्धव बोनर, सुरज, अर्णव , सुयश, अवनी, इ.
भोगावदेवीपर्यटनस्थळसह्याद्रीदेवराई

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close