मा.आ.सतीश चव्हाण यांची पदवीधर मतदारसंघाची सहविचार सभा संपन्न.

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- ०५ नोव्हे. पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी, कॉंग्रेस (आय) व शिवसेना या महाविकास आघाडीचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी आज पदवीधर मतदार, शिक्षक, अभियंते यांच्याशी तुकाई मंगल कार्यालय जिंतूर येथे संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिंतूर-सेलू तालुक्याचे माजी आ.विजयराव भांबळे हे उपस्थित होते.
मा.आ.सतीश चव्हाण यांनी तालुक्यातील पदवीधर मतदार, शिक्षक, अभियंते, बेरोजगार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संवांद साधला. त्यावेळी त्यांनी केलेल्या मागील बारा वर्षातील केलेल्या कामांचा थोडक्यात उल्लेख केला. त्यात सहा हजार शाळांना संगणक वाटप केले. सहा कोटी रु. निधी ग्रंथालयांच्या पुस्तकांसाठी दिला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७०/३० च्या फार्म्युल्यासाठी विधानमंडळात लक्ष वेधी सूचना मांडून वारंवार आंदोलने करून त्या लढ्यास यश मिळवून दिले. यासह अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा उल्लेख केला. तसेच केंद्रातील भाजप सरकार बहुजन समाजाच्या विद्यार्थी धोरणाच्या विरोधात असल्याने त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे असा सुशिक्षित समाजाला मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना मा.आ.विजय भांबळे यांनी मा.आ.सतीश चव्हाण यांना यापुढे देखील भरघोष पसंतीक्रम मतदान करून पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून जिंतूर-सेलू तालुक्यातून सिंहाचा वाटा उचलणार असल्याचा शब्द दिला.
यावेळी कु.प्रेक्षा विजयराव भांबळे- जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस परभणी, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अजय चौधरी, जि.प.सभापती रामराव उबाळे, कॉंग्रेस (आय) चे तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, मनोज थिटे, गणेशराव इलग, शरद मस्के, विश्वनाथ राठोड, विठ्ठल घोगरे, बाळासाहेब घुगे, कपिल फारुकी, दुधाटे आण्णा, मनीषाताई केंद्रे, मधुकर भवाळे, पुष्पा उबाळे, प्रतिभा हारभारे, बंटी निकाळजे, आहेमद बागबान, श्यामसुंदर मते, नारायण चौधरी, वंसत देशमुख यांच्यासह अनेक पदवीधर मतदार, शिक्षक, अभियंते, बेरोजगार अभियंते, यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.