Breaking News

ऐन दिवाळीच्या सणाला तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर  प्रतिनिधी :- जिंतूर तालुक्यातील दहेगाव ढोणे येथील 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळेहातातोंडाशी आलेले पिकाचे नुकसान झाल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या आर्थिक विवंचनेत सापडून स्वतःच्या घरात गळफास घेतल्याची घटना शनिवार 14 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली ऐन दिवाळी सणाच्या दिवशीच आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तालुक्यासह दहेगाव शिवारात अतिवृष्टी झाल्यामुळें शिवारातील शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके पुर्णतः नष्ट झाल्याने परिसरातील गणेश ज्ञानेश्वर ढोणे या तरुण शेतकऱ्याने 13 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आर्थिक विवंचनेत सापडून स्वतःच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब सकाळी 9 वाजता नातेवाईकांच्या लक्षात आली या घटनेची बामणी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी बिट जमादार वाघमरेव्यांनी भेट देऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉ शैलेश राठोड व गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन केले याबाबत बामणी पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयताच्या पश्चात आई, पत्नी व 5 दिवसाचा मुलगा असा परिवार आहे ऐन दिवाळीच्या सणाच्या दिवशीच तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close