Breaking News

निराधार गरजवंत कुटुंबांना दीपावलीनिमित्त महासभेने कडून दिवाळी फराळ साहित्य वाटप

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

नांदेड :- महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने सुमारे दहा जिल्ह्यात 400 पेक्षा अधिक निराधार गरजवंत कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ करण्यासाठी आवश्यक त्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांच्या पुढाकारातून नेहमीच समाज उपयोगी समाजाच्या मदतीसाठी आणि गरज पडेल त्या ठिकाणी समाजाला सहकार्य करण्याचे काम महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते यावर्षी covid-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्यभरात टाळे बंदीच्या काळात सुमारे 2000 पेक्षाही अधिक कुटुंबांना अन्नधान्याचे साहित्य किट स्थानिक आर्य वैश्य समाजाच्या वतीने व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने वाटप करण्यात आले यादरम्यान अनेक सेवाभावी संस्था समाजातील दानशूर व्यक्ती पुढे आले महासभेच्या आवाहनानुसार स्थानिक पातळीवर त्यांनी गरजवंत कुटुंबांना मोठी मदत केली आहे त्याअनुषंगाने आता दीपावलीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील निराधार महिला अपंग गरजवंत असे ज्येष्ठ नागरिक पुरुष यांना दिवाळी निमित्त फराळ करण्यासाठी आवश्यक त्या किराणा साहित्याचे वाटप महासभेकडे प्रथमच करण्यात आले
यासाठी पुढाकार घेत नंदकुमार गादेवार गोविंदराव बिडवई सुभाषराव कन्नावार दिलीपभाऊ कंदकुर्ते प्रदीप कोकडवार यांच्या सहकार्यातून आणि नियोजनातून हे काम राज्यभरात पूर्ण करण्यात आले आहे दरम्यान या उपक्रमाचे राज्यभरातील समाजबांधवांनी स्वागत केले असून समाधान व्यक्त करण्यात आले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close