Breaking News

*दिपावली निमित्त जिल्हा समाज बांधवांना दिल्या शुभेच्छा* – नंदकुमार गादेवार

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

पुणे (दि. १३) —- : दिपावलीचा सण आनंद व दीपोत्सवाचे पर्व असून या निमित्त समाजातील सर्वांच्या आयुष्यात सुख, समृध्दी आणि आरोग्याचा प्रकाश तेजोमय व्हावा; जगावरील कोरोनारुपी संकट दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात हरवून जावे आणि एक नवीन आशादायी सोनेरी पहाट सर्वांच्या आयुष्यात प्रकाशमान व्हावी, अशा शब्दात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार यांनी राज्यातील समाज बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरी देवता प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्यसंपन्नता प्रदान करो, लक्ष्मी पुजनानिमित्त समृध्दी आणि भरभराटीने प्रत्येकाचे कौटूंबीक आयुष्य आनंदमयी व्हावे, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या गोडव्याच्या माध्यमातून कौटूंबीक व सामाजिक स्नेहसंबंध वृध्दिंगत व्हावेत तसेच दीपावलीचा आनंद स्नेह व सामाजिक ऐक्य रुजवणारा ठरावा अशी आशा गादेवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाचे आकडे मंदावले असले तरी धोका आणखी पूर्ण टळलेला नाही,आपला समाज व्यापारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे म्हणून बाजारपेठांमध्ये व रस्त्यांवर सणानिमित्त वाढणारी गर्दी या बाबत गादेवार यांनी चिंता व्यक्त केली असून आपन व आपल्या कुटूंबाला सुरक्षित ठेवून सर्व शक्तीने कोरोनाला हरवणे यासाठी कोरोना विषयक योग्य त्या नियमांची खबरदारी घेणे मास्क वापरणे तसेच योग्य सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी आणखी काही दिवसांसाठी नित्याच्या व सवयीच्या करुन घेण्याचे आवाहनही यानिमित्ताने नंदकुमार गादेवार यांनी केले आहे.

दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात कोरोनाची काजळी दूर व्हावी तसेच फराळ व मिठाईच्या गोडव्याने सामाजिक स्नेह वृध्दिंगत व्हावा या सदिच्छांसह नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन करत नंदकुमार गादेवार यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close