Breaking News

*माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावे* *महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे तहसीलदारांना निवेदन*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी
*गंगाखेड (प्रतिनिधी*) दहावी बारावीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामातून वगळावे अशा मागणीचे निवेदन शिक्षक सेनेच्या वतीने दिनांक 18 डिसेंबर रोजी तहसीलदार गंगाखेड यांना देण्यात आले.
कोरोना मुळे मागील सात महिन्यापासून बंद असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी वर्गाच्या ऑफलाइन तासिका दिनांक 3 डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत. बोर्ड परीक्षेसाठी अतिशय थोडा कालावधी शिल्लक असून प्रत्यक्षात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ कमी पडू शकतो. अगोदरच कमी असलेल्या वेळेत ग्रामपंचायत निवडणुकीचे काम लागल्यास आणखीन त्यात वेळ जाऊ शकतो ,त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून निदान माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणूक कार्यातून सूट द्यावी अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने च्या वतीने दिनांक 18 डिसेंबर रोजी तहसीलदारांना देण्यात आले. याप्रसंगी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड, सरचिटणीस बाळासाहेब राखे, प्रसिद्धीप्रमुख गोपाळ मंत्री, यांच्यासह अनंत काळे ,प्रताप शिसोदे ,शिवप्रसाद मठपती, राजेश लोंढे, बालासाहेब सातपूते, विजय बेरळीकर, जोशी एस पी, खैरे पी जे, रेवणवार एम बी , मठपती आर एन ,गायकवाड बी वि, भोसले बी डी, जोशी एस पी ,अभिजित राजूरकर ,नागसेन साळवे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close