Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीत, नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी त्यांची कोरोना तपासणी करणे आवश्यक, मा. जिल्हाधिकारी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

         परभणी दि.28 :- करोना ( COVID-19 )विषाणू संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी करिता उमेदवाराकडून गावात सभा, कॉर्नर सभा, प्रत्यक्ष भेटीगाठी द्वारे मतदारांशी संपर्क साधण्यात येत असतो. त्यामुळे कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब उमेदवारी अर्ज भरण्यात येत असलेल्या नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी त्यांची आर टी पी सी आर तपासणी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असलेल्या गावातील निवडणुकीस उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत निवडणुकी करिता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याच नामनिर्देशन केंद्रावर किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय/ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील उपलब्ध वैद्यकीय पथकाकडून आर टी पी सी आर चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close