Breaking News

गत 40 वर्षा पासून भोगाव शिवाजीराव देशमुखांचा अभेद्य किल्ला

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

प्रदिप कोकडवार
जिंतूर–तालुक्यातील नेहमी राजकीय पटलावर चर्चेत राहणारे गाव व नंबर तीन ते चारची मोठी ग्रामपंचायत असणारी म्हणून भोगाव (देवी)ची ओळख आहे.सदरचे गाव म्हणजे पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराव देशमुख माजी यांच्या ताब्यात गत 40 वर्षा पासून अभेद्य पणे ताब्यात आहे.त्याचे कारण त्यांनी गाव विकासा साठी अहोरात्र केलेली मेहनत व राजकीय विरहित समाजकारण!!!
1985 पासून सलग 2015 पर्यत 8 वेळा भोगाव देवीची ग्रामपंचायत मतपेटीतून वारंवार एकहाती स्पष्ट विजय मिळवत आलेली हा एक राजकीय पटलावरील अनोखा रिकोर्ड म्हणले तर अतिशोक्ती होणार नाही.
आमदार मेघना बोर्डीकर यांच्या या वेळच्या आव्हानास प्रतिसाद देत गावातील मतभेद विसरून सर्वांगीण विकास हे एकच लक्ष समोर ठेवून सर्व राजकीय गट तट विसरून बिनविरोध ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आली हे विशेष,13 सद्स्य असलेल्या व 4500 मतदान असलेल्या या ग्रामपंचायत सदस्यांचा माजी आमदार रामप्रसाड बोर्डीकर,सौ मीनाताई बोर्डीकर,आमदार मेघना बोर्डीकर यांनी गावी जाऊन या सर्व सदस्यांचा यथोचित सत्कार केला.व गाव विकासा साठी कुठेही कमी पडणार नाहीत अशी हमी भोगावकरांना दिली.
भोगाव (देवी) हे नेहमीच विधानसभा आदी निवडणुकीत बोर्डीकर कुटूंबास निर्णायक लीड देणार गाव म्हणून ओळख करून घेतली हे विशेष कारण ज्या ज्या वेळी मताधिक्य दिले त्या त्या वेळी बोर्डीकर कुटूंबाच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट दिसून आले.2009,2014 व 2019 च्या विधानसभेचे उदाहरण ही विजयाचि स्पष्ट द्योतक आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close