Breaking News

समाजोन्नतीत पत्रकारांच्या लेखणीचा मोठा हातभार – नगराध्यक्ष सबिया बेगम फारुखी

         संपादक :- अकबर सिद्दीकी

       जिंतूर – जनसमर्थक :- पत्रकार  समाजाचा दर्पण असतो. म्हणून पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात नियमितपणे घडवून येणाऱ्या परिवर्तनाचा सकारात्मक संदेश समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरीता स्वतःला झिजवतात. परिणामी समाज नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असतो. समाजोन्नतीत पत्रकारांच्या लेखणीचा मोठा हातभार असल्यानेच राष्ट्र विकासाकडे मार्गक्रमण करीत आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्षा सबिया बेगम यांनी दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त 6 जानेवारी रोजी पत्रकार भवनात ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान आणि कोरोना योद्धांचा गौरव सोहोळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सबिया बेगम कफील फारुकी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, युवा उद्योजक रमण तोष्णीवाल, प्रतिष्ठित व्यापारी सत्यनारायण शर्मा, डॉ पंडित दराडे, ज्येष्ठ पत्रकार एम ए माजिद, निहाल अहमद, अकबर सिद्दिकी, गजानन चौधरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी शहरी आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निःस्वार्थ सेवा पुरवणाऱ्या कोरोना योद्धा स्वच्छता निरीक्षक सालेह चाऊस, मंडळाधिकारी प्रशांत राखे, तलाठी नितीन बुडडे, डॉ विनोद राठोड, खालेद देशमुख, मसूद अहमद, डॉ इरफान पटेल, नागेश आकात आदींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील, शहेजाद पठाण यांनी केले तर आभार शेख अलीम यांनी मानले.
********************************************
*नगराध्यक्ष यांच्याकडून ग्रंथालयाचे आश्वासन*
या कार्यक्रमात पत्रकारांसाठी ग्रंथ वाचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची पत्रकार संघाच्या वतीने मागणी करण्यात आली यानंतर नगराध्यक्ष सबिया बेगम यांनी सदर मागणी मान्य करून ग्रंथालय सुरू करण्याचे आश्वासन दिले.

*********************************************

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close