Breaking News

◆सौ.मेघना बोर्डीकरांचा करिश्मा◆ ●जिंतूर सेलू मतदार संघातील १६८ ग्राम पंचायत निवडणूक पैकी २५ बिन विरोध निवड,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
       जनसमर्थक :- सध्या ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. गावपातळीवरील निवडणूकीतला संघर्ष टोकाचा असतो. यातून बऱ्याच गावांमध्ये हाणामारीच्या घटना घडतात. निवडणूकीनंतरही हा संघर्ष कायम राहत असल्याने विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करण्याचे आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केले होते. अशा ग्रामपंचायतींना २१ लाख रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली होती.
गावकऱ्यांनी एकत्र बसून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडावी. असे आवाहन जिंतूरच्या भाजप आमदार सौ. मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले होते. तसेच बिनविरोध येणाऱ्या ग्रामपंचयातींना २१ लाखांचा निधी देण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. त्यांच्या आवाहनाला मतदारसंघात चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सेलू आणि जिंतूर तालुक्यातील एकुण २५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. या सर्व गावांच्या विकासासाठी भरीव निधी ऊपलब्ध करून दिला जाणार असून गावांच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
बोर्डीकर यांच्या आवाहनास जिंतूर विधानसभा मतदार संघात चांगलाच प्रतिसाद मिळाला. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिंतूर तालुक्यातील १३  तर सेलू तालुक्यातील १२ अशा एकूण २५  ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या. मतदारसंघात एकूण १६८ ग्रामपंचायती आहेत. जिंतूर तालुक्यातील भोगाव, कवडगाव, रिडज मानधनी, जुनूनवाडी, बेलखेडा, जांभरून,अंगलगाव तांडा, शेक, वाघी बोबडे, पिंपळगाव काजळे, येसेगाव, बोरगळवाडी तर सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी, करंजखेडा, खैरी, नीरवाडी खुर्द, गोहेगाव, वाई, लाडनंद्रा, केमापुर, खूपसा, कन्हेरवाडी, पिंप्रुळा, तळतुंबा. या गावांचा यात समावेश आहे .
गावपुढाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या असून आता या सर्व गावांना विशेष निधी ऊपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे देखील मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close