Breaking News

पत्रकार दिनानिमित्त इंडियन रिपोर्टस असोसिएशन तर्फे ‘दर्पण दिनी’ वृध्दाश्रमात फळ वाटप

संपादक :- अकबर सिद्दिकी
परभणीः- मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ काढणारे दर्पणकार ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर’ यांच्या जयंती निमित्त इंडियन रिपोर्टस असोसिएशन नवी दिल्लीच्या महाराष्ट्र शाखेतील जिल्हा परभणी तर्फेे 6 जानेवारी 2021 या दिनी अभिवादन कार्यक्रम झाल्यानंतर ‘मातोश्री’ वृृध्दाश्रामध्ये ज्येष्ठ नागरीकांना तर ‘स्नेह’ वृध्दाश्रमामधील ज्येष्ठ महिलांना मान्यवरांच्या हस्ते फळांचे वाटप करून आगळा-वेगळा उपक्रम राबविला आहे.
येथील वसमत रोडवरील असोला पाटी जवळ असलेल्या ‘मातोश्री’ व ‘स्नेह’ वृध्दाश्रमामध्ये वास्तव्यास असलेल्या वृध्दांना, दर्पण दिनानिमित्त इंडियन रिपोर्टस असोसिएशनचे परभणी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे व हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष जगद्रक्षचे संपादक उत्तमराव धायजे यांच्या पुढाकाराने परभणी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ प्रविण भानेगावकर यांच्याहस्ते फळांचे वाटप करून अल्प प्रमाणात का होईना मायेचा दिलासा दिला. यावेळी वृध्दांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून जातांना दिसत होता. या कार्यक्रमात सा.लोकव्यथाचे संपादक पांडूरंग अंभोरे, मिडियाचे परभणी जिल्हाध्यक्ष सुहास पंडित, माजी विशेष कार्यकारी अधिकारी, सा.वैभव ज्वाला चे संपादक देवानंद वाकळे, सा.टिळकरत्न चे संपादक मंदार कुलकर्णी, न्यूज चॅनलचे राजीव कर्डीले यांनी सक्रीय सहभाग घेतला. ‘मातोश्री’ वृध्दाश्रमामध्ये अधिक्षक गोविंद जावळे तर ‘स्नेह’ वृध्दाश्रमाचे साहिल अहिरे यांनी वृध्दाश्रमाविषयी पत्रकारांना माहिती दिली. मातोश्री मधील वृध्दांनी आपल्या जीवनातील व्यथा बोलून दाखवून आपले मन मोकळे केले. यावेळी माहिती कार्यालयाचे एस.एस.चव्हाण, बबनराव नेटके यांची उपस्थिती लाभली होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close