Breaking News

जिंतूरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्व संध्येला मशाल फेरी,”जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा सहभाग”

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर प्रतिनिधी
शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती करण्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पुतळा परिसरात भव्य मशाल फेरी काढण्यात आली होती यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता

बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात 19 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत असते मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंतीच्या उत्सवावर विरजण आले यामुळे शहरात मोठ्या उत्साहात साजरी होणारी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे परंतु दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून राज्य शासनाच्या नियमानुसार शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी एकत्रीत येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात भव्य मशाल फेरी काढून अभिवादन केले यावेळी जिजाऊ वंदना घेऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यामुळे पुतळा परिसर मशाल फेरीमुळे उजळून निघाला होता
यावेळी शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..
हे हि वाचा
*घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा आज पासून सुरू*
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने “शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात” ही घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा 18 ते 23 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुटुंबांनी आपल्या घरीच शिवजयंती साजरी करावयाची असून सजावटीचे फोटो दिलेल्या व्हाट्स अँप नंबर 9028338110 वर पाठवायचे आहे प्रथम क्रमांक कासाठी 5391 रु द्वितीय 3391 रु ,तृतीय 2391 व उतेजनार्थ 1391 रु रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close