Breaking News

■ रमजान मध्ये नमाज व इफ्तार साठी सूट, ■ प्रेषितांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्या ची जमियत उलमा ए हिंद संघटने ची मागणी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर ;- मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र रमजान महिना दि 13 एप्रिल पासून सुरवात होत असून या महिन्यात रोजा इफ्तार व तरावीह च्या विशेष नमाज साठी परवानगी देण्याची मागणी जमियत उलमा ए हिंद (महमूद मदनी) याच्या वतीने करण्यात आली आहे व तसेच प्रेषितांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी असे दोन निवेदन येथील तहसील कार्यालयात सोमवार दि 12 एप्रिल रोजी देण्यात आले
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दि 13 एप्रिल पासून मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरू होत असून या महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव दिवसभर रोजा ठेवतात व सायंकाळी 7 वाजता इफ्तार होतो तसेच इफ्तार नंतर रात्री 8 वाजता महिनाभर तरावीह ची विशेष नमाज असते त्यामुळे एक महिना नमाज व इफ्तार साठी सचारबंदी मधून सूट देण्याची मागणी व प्रेषितांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे
इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मोहंमद सल.अलेही वसल्लम यांच्या बद्दल अवमानकारक शब्द बोलणाऱ्या नरसिंहानंद सरस्वती यांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी जमियत उलमा ए हिंद महमूद मदनी यांच्या वतीने करण्यात आली आहे
देशातील उत्तर प्रदेश मध्ये एका प्रेस मिटींग व अन्य सार्वजनिक कार्यक्रमात नारसिंहानंद सरस्वती यांनी इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या बद्दल अवमानकारक शब्द काढले असून त्यामुळे देशातील जगातील सर्वच मुस्लिम धर्मीय बंधूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून अपशब्द बोलणाऱ्या स्वामी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर जमियत चे मराठवाडा सचिव मौलाना अब्दुल जलील,मौलाना तजमुल अहमद खां, मुफ़्ती मुसद्दीक,मौ सिराज नदवी,मौ ज़करिया,मुफ़्ती अ हन्नान,काजी वासफोद्दीन,शोएब सिद्दीकी,इस्माइल हाशमी, रहीम पहलवान,एम एजाज, शेख अहमद,वसीम बापू आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close