Breaking News

मानवत बाजार समितीने उभारले 80 बेडचे कोविड केअर सेंटर●8 मे रोजी बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

राज्याती कोविड केअर सेंटर सुरू करणारी पहिली बाजार समिती

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी

              जिंतूर जनसमर्थक :-राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याचे आव्हान राज्य सरकारने केले होते.या

आवाहनाला प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने  राज्यातील पहिले 80 बेडचे सर्व सुविधायुक्त केअर सेंटर उभारले आहे.8 मे रोजी हे कोविड केअर सेंटर सुरु झाले असून  यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.     

     कोरोना च्या दुसऱ्या लाटेत राज्यात कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मर्यादा पडत असून अतिरिक्त तान या यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. याला  प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात या कोविड केअर सेंटर च्या उदघाटन आ बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार डीडी फुपाटे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, गट विकास अधिकारी सुहास कोरेगावे, डॉ अंकुश लाड, पो नी रमेश स्वामी बाजार, सहाय्यक निबंधक पाठक, समितीचे संचालक महादेव नाणेकर, नारायण भिसे. ज्ञानेश्वर मोरे पाटील. बाबासाहेब आवचार, आसाराम निर्मळ. अंबादास तूपसमुद्रे, माणिकराव काळे, गिरिष कत्रुवार सचिव बालासाहेब कदम आदी उपस्थित होते. बाजार समितीने सुरू केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 80 बेडची व्यवस्था केली आहे.सर्व वीज, शौचालय,   सुविधा उपलब्ध केले असून रुग्णासाठी भोजनाची तसेच पाण्याची व्यवस्थाही बाजार समितीने केली आहे. तसेच या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ही बाजार समिती पुढाकार घेणार आहे. 9 मे पासून प्रत्यक्ष रुग्णांना या कोविड केअर सेंटर मध्ये दखल करता येणार आहे.प्रास्ताविक संचालक माधव नाणेकर यांनी  सूत्रसंचालन सत्यशील धबडगे यांनी केले तर आभार बाबासाहेब अवचार यांनी मानले.

सहकार मंत्री पाटील यांच्या कडून कौतुक 

या कोविड केअर सेंटर च्या उदघाटन कार्यक्रमाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालक मंत्री नवाब मलिक, पणन सचिव अनुप कुमार, पणन संचालक सतीश सोनी, सहकार मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश देशपांडे, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जि प चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, जिल्हा बँकेच्या संचालक प्रेरणा वरपुडकर ऑनलाइन सहभागी झाले होते बाजार समितीने सुरू केलेल्या, कोविड केअर सेंटर सुरू करणारी मानवत कृ उ बा ही राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे.राज्यभरातील इतर बाजार समित्यात मानवत कृ उ बा  पॅटर्न राबविण्यात येईल अशी माहिती उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झालेले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी देत या उपक्रमाचे कौतुक केले.

 

पालक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रशासनाला सूचना

 जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हेसुद्धा कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऑनलाइन हजर होते. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी बाजार समितीने सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून प्रशासनाच्या वतीने आवश्यक मदत करण्यासाठी सर्व सूचना देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर साठी पुढाकार घ्यावा असे आव्हान पालक मंत्री नवाब मलिक यांनी केले.

 

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close