Breaking News

नगरकर यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार.

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (मुंबई) या संस्थेच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रातील २०२१ यावर्षीचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न’ पुरस्कार जिंतूर येथील ‘ दै.सकाळ’ चे बातमीदार राजाभाऊ नगरकर यांना नुकताच ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाला आहे.

सदरील संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील गुणीजनांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येते.त्यात यावर्षी राजाभाऊ नगरकर यांच्या ३३ वर्षातील पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली.त्यानुषंगाने २७ व २९ मे रोजी मुंबई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृष्णाजी जगदाळे,स्वागत समिती अध्यक्ष एस.एल.दाते,राजेंद जयस्वाल, मिनाक्षी जगदाळे,मनिषा घाडगे, रोशनी शिंदे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळ्यात नगरकर यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.सन्मानचिन्ह,मानपत्र,मानकरी व गौरव पदक,विशेष महावस्त्र,मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दोनवेळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषविलेल्या नगरकर यांना यापूर्वी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ (३३ वे अधिवेशन), उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघातर्फे कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धेतील ‘शोध वार्तापत्र’ पुरस्कार (१९९६) यासह विविध संस्था, संघटनांकडून अनेक पुरस्कार मिळाले आहे.तर अलीकडे जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘जिंतूररत्न’ (नोव्हेंबर २०२०) व जिंतूर तालुका प्रेस क्लबतर्फे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर विकासवार्ता दर्पण पुरस्कार’ या जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close