Breaking News

नागरिकांच्या आरोग्याशी खेळु नका त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी द्या, आ.मेघना बोर्डीकर जिल्हाधिकारी  भेटिला,

             संपादक :- अकबर सिद्दिकी

       जिंतूर :- गेल्या अनेक दिवसा पासून जिंतूर पालिका कडून दररोज शहरातील नागरिकांना दूषित व दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत आहे या कारणाने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून या
बाबत मुख्याधिकारी यांना वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नसल्याने आ.मेघना बोर्डीकर यांनी दिनांक 31 मे रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली
आ. मेघना बोर्डीकर यांनी जनसमर्थक शी बोलताना सांगितले आजच्या कोरोना संसर्गामुळे सामान्य जनता त्रस्त आहे या मुळे सर्व सामान्य नागरीक आपली  प्रतिरोधक शक्ती व आरोग्य सांभाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे  परंतु होणाऱ्या दूषित पाण्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांच्या आरोग्य शी खेळु नका त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी द्या अशी मागणी आ.मेघना बोर्डीकर यांनी केली या बाबत मुख्याधिकारी यांना वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा परिस्थितीत बदल होत नसलेला पाहून आमदार मेघना बोर्डीकर व ऍड गोपाळ रोकडे नगरसेवक विलास भंडारे यांनी  जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व मुख्याधिकारी यांना त्वरित उपाय योजना करण्यास सूचना दिल्या

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close