Breaking News

*सर्वच व्यापारी आस्थापना उघडण्याची परवानगी द्या !* *जिंतुर तालुका व्यापारी महासंघाची मागणी जिंतूर*

     संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर
जिंतूर तालुक्यातील सर्व आस्थापना व दुकाने लॉक डाऊन च्या काळात संपूर्ण बाजारपेठ दिवसभरातून काही कालावधीसाठी उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिंतूर तालुका व्यापारी महासंघाने निवेदन देऊन तहसीलदार जिंतूर यांच्याकडे केली आहे

जिंतूर तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील व्यापारा शिवाय इतर दुकाने व प्रतिष्ठाने आस्थापना गेल्या दोन महिन्यापासून बंद आहेत यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडला असून आतातरी संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्यावी , पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्तीची व इतर कामे करण्यास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी व्यापारी बांधवांना शासनाकडून विशेष आर्थिक पॅकेज द्यावे बंद काळातील विज बिल सवलत द्यावी पालिकेच्या मालमत्ता कर आकराणीत सूट देण्यात यावी 31 मार्च 2022 पर्यंत कोणत्याही प्रकारचे व्याज व दंड आकारू नये तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेल्या कर्जाच्या हत्याची व व्याजाची रक्कम मुदतवाढ देण्यात यावी कर्जावरील कमीत कमी सहा महिन्याची व्याजाची माफी शासनाकडून मिळवून द्यावी या सर्व बाबीचा सकारात्मक विचार करून माननीय जिल्हाधिकारी यांनी व्यापारी वर्गाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजलाल तोष्णीवाल तालुकाव्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दगड कार्याध्यक्ष प्रदीप कोकडवार उपाध्यक्ष गणेश कुरे कोषाध्यक्ष सत्यनारायण दरगड बाबा पठाण मंदार कोकडवार सचिन चिद्रवार नितीन चिद्रवार कुणाल वट्टमवार चव्हाण आदी व्यापारी उपस्थित होते या निवेदनावर शंभरावर व्यापारी यांच्या सह्या आहेत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close