Breaking News

पोलीसांनी मारहाण करून गुन्हा दाखल केलेल्या त्या युवकाने मिळवला अटकपूर्व जामीन,, परभणीच्या मा.जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन,,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

        जिंतूर :- शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात पोलिसांकडून तरुण शेतकऱ्यास मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीरा तरुणावरच गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडला होता मात्र सदरील तरुणाने मा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन दिनांक 2 जून रोजी अटकपूर्व जामीन मिळवला आहे.

शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात दि. 17 मे रोजी स.पो.उप.निरीक्षक अर्जुन पवार यांनी तरुण शेतकऱ्यास मारहाण केली होती.या प्रकरणाचा व्हिडिओ संपूर्ण राज्यभरात व्हायरल झाल्या नंतर हा मारहाणीचा प्रकार उघडकीस आला होता तसेच या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी स.पो.उप.निरीक्षक अर्जुन पवार यांना पत्रकारांनी फोन केला असता त्यांचा ही एकेरी भाषेचा उल्लेख करून अपमान केला होता. या संदर्भातील बातम्या ही दि. 20 मे रोजीच्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या होत्या. या बातम्या प्रकाशित झाल्या नंतर मारहाण झालेल्या तरुण शेतकऱ्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अटकेच्या भितीने युवकाने ॲड. सुनिल बुधवंत यांच्या मार्फत परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी विनंती अर्ज दाखल केला होता.ॲड. बुधवंत यांनी दि. 2 जून 2021 रोजी न्यायालयात बाजू मांडताना तरुण शेतकरी हा निर्दोष असून तोच पीडित आहे आणि स.पो.उप.निरीक्षक अर्जुन पवार यांनी स्वतःच्या बचावासाठी व स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचे मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून परभणीच्या मा.जिल्हा व सत्र न्यायालयाने तरुण शेतकऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे

हे हि वाचा
मारहाणीचे हे प्रकरण संपूर्ण राज्यात सोशल मीडिया मार्फत तसेच वर्तमानपत्रात चर्चेत आले होते परिणामी पत्रकारांना अपशब्द वापरल्यामुळे पत्रकारांनी अर्जुन पवार यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती होती यावेळी पत्रकारांनी दिलेल्या निवेदनावर आत्ता जिल्हा पोलिस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

हे हि वाचा
भरचौकात लाथा चापटाने विनाकारण मारहाण झालेला तो तरुण शेतकरी आता स.पो.उप.निरीक्षक अर्जुन पवार यांच्यावरच मारहाणीचा तसेच शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे समजले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close