Breaking News

“आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून नगर परिषद जिंतूर अंतर्गत ७०० घरकुलांना एकूण ७ कोटी रु.चा निधी मंजूर

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर – जिंतूर शहरातील नगर परिषद अंतर्गत खुल्या प्रवर्गातील नागरिकांना ‘प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत’ डी.पि.आर.-३ मधील ७०० घरकुलांना एकूण ७ कोटी रु.ची राज्यशासनाची मंजुरी आज रोजी मिळाली आहे आणि लवकरच मंजूर निधी शासनाकडून वितरीत करण्यात येणार आहे.
राज्याचे उप-मुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार साहेब, व मा.ना.श्री.जितेंद्र आव्हाड साहेब, गृहनिर्माण मंत्री यांनी सदर निधीस स्वतः लक्ष घालून मंजुरी दिली आहे. त्यासाठी मा.आ.विजय भांबळे यांनी पाठपुरावा केला आहे.
खुल्या प्रवर्गातील बेघर नागरिकांना राहण्यासाठी पक्के घर मिळावे या उद्देशाने प्रधान मंत्री आवास योजनेतून एकूण २.५० लक्ष एवढा निधी लाभार्थ्यास दिला जातो या योजनेतून लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी ७ कोटी रु. एवढा निधी खेचून आणला आहे.
या अगोदर नगरी परिषद जिंतूर अंतर्गत १२५१ घरकुल मंजूर करण्यात आले होते त्यापैकी याअगोदर ६८० घरकुल पूर्णत्वाकडे गेले असून बाकी राहिलेले ७०० घरकुलांचा डीपीआर -३ आज रोजी मंजूर करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close