Breaking News

शेतकऱ्यांना तहसील मार्फत पुरविणार फेरफार नक्कल – उमाकांत पारधी

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- प्रदिप कोकडवार- जिंतूर सेलू उपविभागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांची पिक कर्जासाठी लागणाऱ्या फेरफार नक्कलकरीत गैरसोय होऊ नये यासाठी तहसील कार्यालय मार्फत फेरफार नक्कल पुरविण्यात येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी फेरफार नक्कलसाठी तहसील कार्यालयात येऊ नये असे आव्हान उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
शेतक-यांनी पिककर्जाला जोडण्यासाठी फेरफार नक्कल घेण्यासाठी तहसिल कार्यालयात येउ नये, पिक कर्जासाठी फेरफार नक्कल तहसिल कार्यालयामार्फत पुरविण्यात येणार असल्याने सेलू उपविभागाचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी जिंतूर तहसील कार्यालयात गुरुवार 03 जुन रोजी सर्व बँकांच्या प्रतिनिधीची बैठकी आयोजित केली होती. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात कर्ज वितरण करणा-या सर्व बँकांच्या प्रतिनिधी यांची बैठक आगामी खरीप हंगामातील कर्ज वितरणाबाबत आयोजीत करण्यात आली होती. सध्याच्या कोव्हीड 19 काळात शेतक-यांची गैरसोय होउ नये म्हणुन प्रत्येक गावामध्ये शेतक-यांचे पिककर्जाचे अर्ज् स्विकारण्यासाठी नोडल अधिकारी यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. त्यांच्याजवळ शेतक-यांनी गावामध्येच पिक कर्जाचा भरलेला अर्ज दयावयाचा आहे. त्यासोबत फेरफार नक्कल देण्याची गरज नाही. सर्व शेतक-यांनी पिक कर्जासाठी तहसिल मार्फत फेरफार नक्कल पुरविण्यात येणार आहे. यासाठी शेतक-यांनी तहसिल कार्यालयात येऊ नये असे आवाहन मा. उपविभागीय अधिकारी श्री. उमाकांत पारधी यांनी सर्व शेतक यांना केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close