Breaking News

*जिंतूरच्या मराठी पत्रकार संघाकडून* *जाफराबाद व औरंगाबाद घटनेचा निषेध*

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- येथील तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील वृत्तपत्र कार्यालयावर व पत्रकारावर हल्ला झाल्याच्या घटनेचा दि १४ जून रोजी माननीय गृहमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
जिंतूरचे नायब तहसीलदार श्री गावंडे यांनी हे निवेदन स्वीकारले. सदर निवेदनात जाफराबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर अवैध वाळूची बातम्या दिल्यामुळे हल्ला झाल्याने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर संघाचे तालुका अध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण, सचिव गुणीरत्न वाकोडे, एम ए माजिद, निहाल अहमद,एम.के.कादरी,शेख शकील, विनोद पाचपिल्ले, अकबर सिद्दिकी, प्रदीप कोकडवार, रफिक तांबोळी, रामप्रसाद कंठाळे, अभिजित चौधरी, गजानन काळे, शेख रहिम,मुज्जू सिद्दीकी,सय्यद फैरोज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close