Breaking News

जिंतूर – सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज, शेती पूरक कर्ज व विविध योजनेतील इतर कर्ज तात्काळ वितरीत करा – मा.आ.विजय भांबळे

      संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- १४ जून, जिंतूर व सेलू तालुका जि.परभणी येथील नागरिक व शेतकरी तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक ता.जिंतूर व ता. सेलू आणि अॅक्सिस बँक, देणा बँक व एच डी एफ सी बँक ता.सेलू येथील संबंधित असून अनेक शेतकरी पिक कर्जापासून बऱ्याच दिवसापासून वंचित आहेत. नवीन पिक कर्ज धारक तसेच जुने परंतु वाढीव पिक कर्ज धारक, शेतकरी कर्जमाफी, याद्या, बँकेचे आदेश यांच्या कचाट्यात सापडून पिक कर्जापासून वंचित राहिले आहेत. तसेच पिक कर्जासाठी बँकांकडे शेतकऱ्यांनी मागणी केली असता सदर बँकेतील कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करित आहेत. अनेकवेळा पुढील महिन्यातील तारखा देऊन देखील एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रकरणे प्रलंबित ठेवत आहेत. शेतकऱ्यांना पिक कर्ज पुरवठा करण्यसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून सर्व बँक शाखांना प्रती एकर व पिकाचे उत्पन्न लक्षात घेऊन कर्ज पुरवठा करण्याचे आदेश करत आहे. परंतु, जिंतूर व सेलू तालुक्यातील बँक शाखा कुठलेही टार्गेट पूर्ण न करता दलालांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून विशिष्ट शेतकऱ्यांनाच पिक कर्ज व शेती पूरक कर्ज पुरवठा करत असल्याचे दिसून येत आहे. जिंतूर व सेलू तालुक्यातील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी बँकांकडून पिक कर्जाची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना वेळेवर पिक कर्ज पुरवठा म्हणजेच ३० मे च्या आगोदर होणे बंधनकारक आहे, तरी देखील तालुक्यातील बँका शेतकऱ्यांना टाळाटाळ करत जून पासून ते ओक्टोंबर पर्यंत विलंबनाने कर्ज पुरवठा करत असतात, त्यामुळे सदर पिक कर्ज व शेतीपूरक कर्ज शेतकऱ्यास पेरणी साठी कामी येत नाही, व त्यामुळे शेतकरी एन पेरणीच्या वेळेत संकटात सापडत आहेत.
त्याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी अनेक बेरोजगार युवक, युवती, महिला व नागरिकांनी विविध योजनेतून (अण्णासाहेब पाटील, समाजकल्याण, जिल्हा उद्योग, नाबार्ड, मुद्रा लोण, गहाण खत, गृह कर्ज इ.) कर्ज प्रकरणांची मागणी केलेली आहे. परंतु, जिंतूर तालुक्यातील सर्व शाखा ह्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असून सर्व कर्ज प्रकरणे गेली दोन वर्षापासून प्रलंबित आहेत. ती तत्काळ मंजूर करण्यात येवून वितरीत करण्यात यावी.
असे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिंतूर व सेलू कडून जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले.यावेळी मा.आ.विजय भांबळे, अजयराव चौधरी, रामराव उबाळे, मनोज थिटे, ज्ञानेश्वर ताठे, वंदना इलग, पप्पू गाडेकर, आनंदराव डोईफोडे, विश्वनाथ राठोड, अशोक काकडे, प्रसादराव बुधवंत, बाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, बालासाहेब रोडगे, रामेश्वर जावळे इ.उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close