Breaking News

“नगर परिषद जिंतूर अंतर्गत घरकुल योजनेचे मंजूर पत्र वाटप संपन्न”

.           संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- १७ जून, नगर परिषद जिंतूर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे डी.पि.आर. -३ मा.आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून त्यात ७०० मंजूर घरकुल धारकास अॅड.संजय भांबळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी जनसंपर्क कायार्लय जिंतूर येथे मंजूर पत्र वाटप करण्यात आले.
मा.आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून ७०० घरकुल मंजूर झाले असून मा.आ.विजय भांबळे यांनी नगर विकास मंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून डी.पि.आर.-३ हा मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डी.पि.आर. तीन मध्ये ७०० घरकुल मंजूर केले असून प्रत्येकी २.५० लक्ष रु. अनुदान वाटप करण्यात येणार आहे. जिंतूर शहरात डी.पि.आर.-१ व डी.पि.आर.-२ अंतर्गत आज पर्यंत १२५० घरकुल मंजूर करण्यात आले असून ५६० घरकुल पूर्ण झाले असून ५०९ घरकुल प्रगतीपथावर आहेत आज नव्याने ७०० घरकुल मंजूर झाले आहेत त्यामुळे जिंतूर शहरास आजपर्यंत १९५१ घरकुल मजूर झाले आहेत. तर परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त घरकुल मंजूर असलेला तालुका म्हणून जिंतूर चे नाव प्रथम क्रमांकी आहे.
यावेळी रामराव उबाळे (समाजकल्याण सभापती जि.प.परभणी), बाळासाहेब भांबळे (उपनगराध्यक्ष न.प.जिंतूर, नगर सेवक चंद्रकांत बहिरट, आहेमद बागबान, बंटी निकाळजे, शोएब जानिमिया,शाहेद बेग मिर्झा, दलमीर पठाण, उस्मान पठाण, मनोहर डोईफोडे, दत्तराव काळे, श्यामराव मते, शेख इस्माईल, लखुजी जाधव यांच्यासह नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था अकोला यांचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close