Breaking News

पेट्रोल डिझेल गॅस दर वाढ व महागाईच्या निषेधार्त जिंतुर येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे अंदोलन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतुर : जिंतुर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवस सकल्प दिन म्हणुन साजरा करीत असतांना दि.१९ जुन रोजी अंदोलन करण्यात येऊन त्यात शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करीत पेट्रोल डिझेल गॅस दर वाढ व महागाईच्या निषेध करण्यात अाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशाहीन नेतृत्वामुळे देश एक अभुतपुर्व संकटाचा सामना करीत अाहे कोरोनामुळे देशाची मोठी हानी होऊ शकते असा इशारा देत वेळीच उपाययोजना करा अशी सुचना खासदार राहुल गांधी यांनी सरकारला केली होती परंतु हा जवाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याचे काम देशातील मोदी सरकारने केले आहे असा आरोप याप्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागसेन भेरजे यांनी केला.सदर अंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नागसेन भेरजे यांच्यासह परभणी जिल्हा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रदिप देशमुख,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राम देशमुख,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुलेमान सिद्दीकी,ज्ञानेश्र्वर राठोड,अनशाल सिद्दिकी,सुरज कनकुटे,पिंकल खंदारे,राज कनकुटे,ध्रुपत गायकवाड,दिपक ढगे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close