Breaking News

◆आज पर्यंत11कर्मचारी केले सस्पेंड 12 वा तुझा नंबर लावतो पोलीसाला धमकी दिल्याने खंडेराव आघाव यांच्यावर 353 गुन्हा प्रमाणे अटक ◆आघाव यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठळी

संपादक :-अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याचे प्रभारी ए पी आय यांनी मौजे धमधम येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखने कामी गेले अस्ता माझ्या करकर्त्यावर प्रतीबंधक कार्यवाही करू नका असे परभणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव आघाव यांनी सदर अधिकारी यांना फोनवरून धमकी देत म्हणाले की आज वर मी 11 सरकारी कर्मचारी निलंबित केले आहे 12 वा तुझा नंबर लावतो म्हणून सरकारी कामात
अडथळा निर्माण केला म्हणून बामणी पोलीस ठाण्यात यांच्यावर 353 प्रमाणे गुन्हा नोंद करून आघाव यांना अटक करून आज जिंतूर न्यायालयाचे समोर हजर केले अस्ता 14 दिवसाची न्यायालयीन कोठळी देण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे खुलासा असा- दि 20जून21 रोजी नमुद ता.वेळी व ठिकाणी यातील फिर्याद हे मोटार वाहन कायद्याचे केसेस करित असताना फिर्यादीचा मोबाईल क्रमांक 9359666480 या वर यातील आरोपींने त्याचे मोबाईल क्रमांक 9322714047 वरुन फोन करुन सांगितले की तुम्ही मोटार वाहनचे केस करून लोकांना त्रास का देता माझी पोच DIG व मुख्यमंत्र्या पर्यंत आहे मी आतापर्यंत जिंतूर तालुक्यातील आकरा सरकारी कर्मचारी निलंबित केले आहे आता तुमचा नंबर लावतो तुमची नोकरी घालवतो असे म्हणून फोनवर धमकी दिली तसेच गुरन 60/2021 कलम 143,144,149,324,323,504,506 भादवि. मधिल आरोपिस पोलीस स्टेशनला का बोलवता असे म्हणुन तपासाचे कामात व मौजे धमधम येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखने कामी करण्यात येणारी प्रतीबंधक कार्यवाही करु नये या करिता मोबाईल द्वारे धमकावून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आल्या ची माहिती ठाणे प्रभारी राजाभाऊ रुपा चव्हाण यांनी दिली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close