Breaking News

*वटवृक्षाची लागवड करुन वटपौर्णिमा केली साजरी*

जिंतूरात वटपौर्णिमा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :-  जिंतूर तालुक्यातील उपक्रमशील जी. प. प्राथमिक शाळा पांगरी येथील महिला शिक्षकांनी वडाच्या झाडाची रोपे लावून वटपौर्णिमा सण साजरा केला.
परभणी जिल्ह्यातील जी.प. प्राथमिक शाळा पांगरी तालुका जिंतूर या शाळेचे मुख्याध्यापक के. सी. घुगे यांच्या प्रेरणेने आज दि. 24.06.2021 रोजी शाळेतील महिला शिक्षकांनी वटपौर्णिमा सणाच्या दिवशी मैनापरी मंदिर परिसरातील डोंगरावर वडाच्या झाडाची रोपे लावून आधुनिक पद्धतीने सण साजरा केला. एकीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाची हानी होत असतांना पांगरी शाळेने राबविलेलला हा उपक्रम अभिनंदनीय आहे. या उपक्रमाच्या यशासाठी झाड फाउंडेशन जिंतूरचे सदस्य अॅड.माधव दाभाडे व साई देशमुख यांनी सहकार्य केले. तसेच याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक के.सी. घुगे महिला शिक्षिका श्रीमती अल्का खिल्लारे, श्रद्धा शेंडे, सुनंदा जाधव, शिवगंगा जांभळे, रुपाली नागरगोजे, सहकारी शिक्षक राजेश सातपुते व डी. एस. सावंत उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close