Breaking News

◆राज्यातील तिघाडी सरकार हे बिघाडी,भकास व वसुली  सरकार। -आ.मेघना बोर्डीकर, ◆ओबीसीआरक्षण च्या मुद्द्यावर आ.मेघना बोर्डीकरांच्या नेत्रत्वात चक्काजाम आंदोलन,

 

संपादक :-अकबर सिद्दिकी

जिंतूर–राज्यातील तीन पक्षाचे व वेगवेगळ्या विचारांचे सत्ते साठी एकत्र आलेले सरकार हे बिघाडी,भकास व वसुली सरकार असल्याचा घनघनाती आरोप आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केला.त्या भाजप तर्फे आयोजित ओबीसी आरक्षण समर्थनार्थ आंदोलन संबोधित करत होत्या.त्यांनी राज्य सरकार वर असाही आरोप केला की कुंभकर्णेच्या झोपित असलेले गेंड्याची कातडी अंगावर असलेले हे सरकार सत्तेत येऊन 18 महिने झाले तरी यांना एम्पिरीयल डाटा अद्याप कोर्टात पाठवता आलेला नाही.हीच घोडचूक आमच्या ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या मुळावर आलेली आहे.
राज्यसरकारची हीच खेळी ओबीसींच्या आरक्षणाचा बळी घेत असल्याचा घणघाणाती आरोप बोर्डीकर यांनी केला.शेतकऱ्यांना पीक विमा असेल तसेच पीक कर्ज असेल या साठी मोर्चे आंदोलन करावे लागत आहे.हे तीन पक्ष्यांच्या बिघाडी सरकारच्या राज्यात कोणताही घटक सुखी नाही असाही आरोप त्यांनी लगावला.
भाजप सरचिटणीस प्रमोद कराड यांनीही राज्यसरकारवर चौफेर टिकेची झोड उठवत असे आरोप लावले की सरकार मधील मंत्रीच समता परिषदेचे छगन भुजबळ, विजय वेटीडीवार हे ओबीसी नेते सत्तेत असून आंदोलन करत आहेत.हा निव्वळ सावळा गोधळ करत आहेत.असा आरोप त्यांनी केला.अबाधित असलेले 27 टक्के आरक्षण तत्काळ द्यावे अशी मागणी कराड यांनी केली.सतोष राठोड,माबुद कुरेशी,शिवाजी घुगे,प्रसाद देशमुख आदींनीही मत व्यक्त केले.
शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आज सकाळी 11 ते 2 वाजे पर्यत पार पडलेल्या चक्का आंदोलनाने शहराच्या चोहो बाजूची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.परभणी,औंढा,एलदरी व औरंगाबाद या चारही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

      हे ही वाचा
शाहीर मुंजे यांच्या ढोलकी वरील गाण्याने लक्ष्य वेधले
या चक्का जाम आंदोलनात चारठाणा येथील प्रसिद्ध लोकशाहीर भारत मुंजे यांनी आपल्या बहारदार शैलीत ओबीसी आरक्षण समर्थनार्थ गाणे गात उपस्थित जनसमुदयास मंत्रमुग्ध केले.
या आंदोलनात पोउअ श्रवण दत्त व पोनी प्रमोद पाटील हे स्वतः आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्तात तैनात होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पंडित दराडे यांनी केले.दिलेल्या निवेदनावर आमदार सौ.मेघना बोर्डीकर या सह माजी नगराध्यक्ष सचिन गोरे,डॉ पंडित दराडे,दतात्रय कटारे,सुनील घुगे,सुमेध सूर्यवंशी,सौ संगीता राऊत,नितीन वाणी, महादू दराडे,अमोल देशमुख, प्रमोद कराड,रमेश मोहिते,लक्ष्मण बुधवंत,अशोक बुधवंत, रामेश्वर खिस्ते, डॉ.गुलाब सांगळे, संदीप बुधवंत, भास्कर सांगळे, युवराज घनसावध,भगवान वटाने,ऍड सुनील मते,सौ सुमनबाई बार्शीकर, सौ त्रिवेणी बुधवंत, सोपान राठोड, ऍड भगवान घुगे,संदीप घुगे,उत्तम जाधव,पांडुरंग आढे,कैलास जाधव, मनोहर सातपुते,रोहित देशपांडे, विलास भंडारे,मो हकीम मो नजर,मुसा भाई,केशव घुले,भगवान पालवे,या सह असंख्य भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close