Breaking News

जिंतूरात आ. बोर्डीकरांनी राबवले धडक स्वच्छता अभियान ▪️२०० स्वयंसेवकांकडून शहरभर स्वच्छता▪️प्लास्टीक मुक्तीचा संदेश ▪️हातात झाडू घेवून आमदार रस्त्यावर ▪️

★ संपादक:- अकबर सिद्दिकी ★

जिंतूर :- शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलीदान सप्ताहाचे औचित्य साधत जिंतूर शहरात धडक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. हातात झाडू घेवून रस्त्यावर ऊतरलेल्या आ. सौ. मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी नागरिकांना प्लास्टीक मुक्ती आणि स्वच्छतेचा संदेश दिला.

भारतीय जनता पार्टीकडून शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती बलीदान सप्ताह म्हणून साजरी केली जात आहे. या अंतर्गत स्वच्छता सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून जिंतूरच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर स्वतः हातात झाडू घेवून रस्त्यावर ऊतरल्या होत्या. शहरातील अन्नाभाऊ साठे चौक ते मुख्य रस्त्यावर हे स्वच्छता अभियान २०० स्वयंसेवक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून राबवण्यात आले. रस्त्यावरील प्लास्टीकसह ईतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.

आ. बोर्डीकर यांनी प्रत्यक्ष दुकानदारांच्या भेटी घेत प्लास्टीक मुक्तीचा संदेश दिला. विशेषकरून पानपट्टी चलकांना गुटखा पुड्या आणि तत्सम प्लास्टीक कचरा जागेवरच जमा करणेबाबत त्यांनी जागृती केली. तसेच किराणा आणि ईतर दुकानदारांना कापडी पिशव्या वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले.

जिंतूरात अस्वच्छेचा कळस – आ. बोर्डीकर
आज या अभियानाच्या निमित्ताने शहराच्या विविध भागांना भेटी दिल्या. सगळीकडेच सिट कळस गाठला आहे. जिंतूर नगर परिषद स्वच्छतेच्या नावाखाली महिण्याला लाखो रुपये खर्च दाखवते. तो पैसा नेमका कुठे जातो ? असा सवाल आ. बोर्डीकर यांनी या निमित्ताने ऊपस्थित केला. नगर परिषदेचे प्लास्टीक मुक्ती अभियानही कागदावरच राबवले जात असल्याचे आज सिद्ध झाले आहे. पालीका प्रशसनाने नागरिकांच्या जिवीताशी खेळणे थांबवावे अन्यथा याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, असा ईशारा आ. मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे..या अभियाना प्रसंगी आमदार सौ.मेघना बोर्डीकर या सह माजी नगराध्यक्ष सचिन गोरे,डॉ पंडित दराडे(भाजप जिल्हाउपाध्यक्ष),ब्रिजगोपाल तोष्णीवाल,दतात्रय कटारे,सुमेध सूर्यवंशी,नगरसेवक.गोपाळ रोकडे, अब्दुल रहेमान, विलास भंडारे,प्रदीप चौधरी,फेरोज कुरेशी,प्रदीप चव्हाण, अब्दुल मुखीद,सुनील भोंबे,प्रदीप कोकडवार,प्रदीप जाधव, नागेश सुतार, नागेश अकात,नितीन वाणी, अमोल देशमुख, रमेश मोहिते,युवराज घनसावध, मनोहर सातपुते,मो हकीम मो नजर,मुसा भाई,गणेश भाकरे, एकनाथ देशमुख इत्यादी सह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Close