Breaking News

◆पोलिसांनी माझ्याकडून 35000 रुपय घेतल्या ची बाब उघड होऊ नाही म्हणून आघाव यांच्यावर केला गुन्हा दाखल,, *सदाशिव गणपत कांगणे यांनी दिली माहिती* *आघाव यांच्या 353 केसला नवीन वळण*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- जनसमर्थक  पोलिसांकडून माझ्यावर अन्याय होत असल्याने माझे नातेवाईक खंडेराव आघाव माझ्या मदतीला धावून आले व पोलिसांनी माझ्याकडून घेतलेले पैसे ही बाब उघड होऊ नये म्हणून आघाव यांच्यावरच 353 गुन्हा दाखल केला असल्याची माहिती या प्रकरणातील अन्याय झालेल्या सदाशिव गणपत कांगणे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली मी दोन-तीन दिवसात यासंदर्भात लेखी तक्रार पोलीस अधीक्षक यांच्या कळे देणार असल्याचे माहिती यावेळी देण्यात आली म्हणून या प्रकरणात खरंच खंडेराव आघाव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला का असा प्रश्न उपस्थित झाला असून या प्रकरणात पोलिसांनी सदाशिव कांगणे यांच्याकडून 35000 रुपये घेतल्याचा आरोप कांगणे यांनी केला आहे यामुळे या प्रकरणाला नवीन वडण लागले असल्याचे माहिती समोर आली आहे
या प्रकरणातील सर्व माहिती अशी की बामणी पोलीस स्टेशन हद्दीतील सदाशिव गणपत कांगणे व त्यांच्या भावा सोबत शेतीच्या वादातून भांडण होऊन हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले या प्रकरणातील तपासी पोलीस अधिकारी राजेश चव्हाण यांनी सदर प्रकरणात सदाशिव कांगणे यांच्याकडून आधी दहा हजार रुपये व नंतर पंचवीस हजार रुपये असे असे एकूण 35000 रुपये घेतले या प्रकरणात 324 केस ची जमानत झाली उरलेल्या 107 केस मध्ये पोलीस अधिकारी चव्हाण यांनी कांगणे यांना पुन्हा 14 हजार रुपये दे नाहीतर तुला जेलमध्ये टाकतो म्हणून दोघात वाघ झाला दरम्यान सदाशिव कंगणे यांच्या मुलाने खंडेराव आघाव यांना फोन केला व त्यांना माहिती दिली की या प्रकरणात आमच्याकडून चव्हाण यांनी पस्तीस हजार रुपये घेऊन सुद्धा आम्हाला जेलमध्ये टाकतो म्हणून धमक्या देत आहे
यावरून खंडेराव आघाव यांनी फोनवरून पोलीस अधिकारी चव्हाण यांना तुम्ही पैसे घेऊन सुद्धा आमच्या माणसाला का त्रास देतात म्हणून खंडेराव आघाव यांच्यावर 353 गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप पत्रकारांसमोर एका व्हिडीओ क्लिप द्वारे करण्यात आला
दरम्यान जिंतूरात अलीकडच्या काळात जिंतूर पोलीस ठाण्यात 2 ते 3 व्यापाऱ्या व इतर नागरिकांवर 353 केस झाले असल्याने खर्च पोलीस सूडबुद्धीने नागरिकांवर पोलिसांची भीती कायम रहावे म्हणून कारवाई करत आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थिय होतो
त्या पोलीस अधिकारी विरुद्ध तक्रार द्या कार्यवाही करतो परंतु पोलिसांना धमकी सहन करणार नाही जर या प्रकरणात खरंच पैशाची देवाण-घेवाण झाली असेल तर
मी याचा समर्थन करणार नाही अन्याय झालेल्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा काम आमचा आहे त्या पोलीस अधिकारी विरुद्ध लेखी तक्रार द्या मी यासंदर्भात चौकशी करून त्या पोलिस अधिकारी वर कारवाई करतो परंतु कोणी पोलिसांना धमकी देत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणारच डी वाय एस पी श्रवणदत्त यांनी अशी प्रतिक्रिया जन समर्थक शी बोलताना दिली
आय पी एस पोलीस अधिकारी श्रवणदत्त 

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close