*जिंतूरात अतिवृष्टी* “◆काँग्रेस नेते सुरेश नागरे नुकसान ग्रस्त भागातील नागरिकांची घेतली भेट मदतीचे दिले आश्वासन’

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- जिंतूरात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिंतूर शहरात व तालुक्यात शेतकऱ्यांची नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने काँग्रेस नेते सुरेश नागरे यांनी शहरातील नुकसानग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन जिंतूर तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ या भागातले पंचनामे करून नागरिकांना मदत देण्याची मागणी केली आहे
गेल्या दोन दिवसापासून जिंतूर शहरात व तालुक्यात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे शेतात घरात दुकानात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे शहरातील उलटी नदी दर्गा परिसर कादरी प्लॉट जमजम कॉलनी अबुजर कॉलनी आदी भागातपावसाचे पाण्यामुळे या भागातील नागरिकांची संपत्तीचे मोठे नुकसान झाले असल्याने सुरेश नागरे यांनी या भागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले
सुरेश भैया नागरे यांच्या सोबत केशवराव बुधवंत रामेश्वर घुगे बासू खान पठाण सिराज खान जाबीर मुल्ला अनिल उर्फ गब्बर घनसावंत आदी काँग्रेस कार्यकर्ता सोबत होते तालुक्यातील मौजे गारखेडा येथील पाझर तलाव फुटल्याने या भागाचे व शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तेव्हा शासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान ग्रस्तना तात्काळ शासनाने मदत द्यावी असे निवेदन जिंतूर तहसीलदार यांना देण्यात आले निवेदनावर सुरेश भैया नागरे यांची स्वाक्षरी असून निवेदन सादर करत असताना रामेश्वर घुगे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश घनसावंत सुलेमान सिद्धिकी नगरसेवक संतोष आंधळे गजानन नागरे पप्पू टाकरस अनंता वाकळे पवन अंभोरे मौलाना सिराज प्रबुद्ध घनसावंत बाळासाहेब घुगे आनंद घनसावंत बाळासाहेब घुगे शहबाज खान सतीश देशमुख आदी उपस्थित होते