◆आमदार मेघना बोर्डीकर यांनी नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची केली मागणी” जिंतूरात पावसामुळे नागरिक हवालदिल तर लाखोची संपत्तीचे नुकसान वहान गेली वाहून

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :– तालुक्यात कालपासून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली असून रहिवाशी वस्तीपरीसरात घरात व दुकानात पाणी शिरून घरांचे लाखो रुपयांचे संपत्ती चे नुकसान झाले असल्याचे चित्र समोर आले आहे यामुळे कालपासून रात्रभर पावसाने जोर काढल्याने लोकांनी आपले घरे सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला यासंदर्भात आमदार मेघना मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर तहसीलदार यांना लेखी दे निवेदन देऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे
जिंतूरात बसस्टँड च्या बाजूस उलटी नदी वाहत आहे दिनांक 21जुलै रोजी दिवस व रात्री मोठा पाऊस झाला या मुळे या पूर आल्या मुळे नदीच्या काठावर असलेले वस्ती व दुकानात पूर आल्याने पावसाचे पाणी शिरून या भागातले नागरिकांचे लाखो रुपयाचे संपत्तीचे मोठे नुकसान झाले तर या नदीच्या काठावरच्या दोन चार चाकी वाहन वाहून गेले तसेच या भागाततील घरात हि मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने या भागातली नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली व तसेच येलदरी रोड च्या लगत असलेले जमजम कॉलनी अबुजर कॉलोनी दर्गा परिसर कादरी प्लाट बौद्ध नगर या भागात ही नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाल्याने आमदार मेघना बोर्डीकर यांनी एका निवेदनाद्वारे जिंतूर तहसीलदार यांना नुकसान ग्रस्त भागाची प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष मुन्ना गोरे नगरसेवक गोपाल रोकडे डॉक्टर पंडीत दराडे नगरसेवक विलास भंडारी बीजेपी शहर अध्यक्ष कटारे अब्दुल मुखीद नगरसेवक रहेमान
बाळासाहेब देशमुखआदी उपस्थित होते