Breaking News

जिंतूर जमाते- इस्लामी- हिंद तर्फे पावसात नुकसान ग्रस्त नागरिकांना शासनाने मदत देण्याची मागणी

संपादक :- अकबर सिद्दिकी
              जिंतूर :- जिंतूर येथे गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे सकल भागातल्या नागरिकांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त नागरिकांना प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी जिंतूर इस्लामी हिंद तर्फे एका निवेदन द्वारे करण्यात आली
जिंतूर येथे गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाच्या पाणी ने लोक परेशान झाले व त्यांच्या संसार उपयोगी सामान दुकानाचे सामानाचे मोठे नुकसान झाले बस स्टँड दर्गा परिसर कादरी प्लॉट जमजम कॉलनी अबुजर कॉलोनी बौद्ध नगर साठे नगर या भागातल्या राहणाऱ्या नागरिकांच्या घरात दुकानात पावसाचे पाणी शिरले याची माहिती मिळताच जिंतूर इस्लामी हिंद चे तालुका अध्यक्ष अहमद सिद्दिकी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली नागरिकांच्या व्यथा जाणून घेऊन जिंतूर तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे जिंतूर झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त नागरिकांचे शासनस्तरावर पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली या वेळी स्थानीय अध्यक्ष अहेमद सिद्दीकी, सचिव मोहियोद्दीन खान, अजहरुद्दीन सिद्दीकी आणि जव्वाद खान उपस्थित होते.*

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close