Breaking News

आमदार मेघना बोर्डीकर यांचा सरकार ला सवाल चांगले आय ए एस अधिकारी परभणीला नको का ?

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- परभणी जिल्ह्याचे नवीन महिला व कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी म्हणून आय ए एस आचल गोयल यांची बदली करण्यात आली होती परंतु सरकारच्या निकटवर्तीय लोकांनी खडक शिस्तीत काम करणारा अधिकारी परभणी जिल्ह्यात नको का असा सवाल जिंतूर सेलू चे आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला असून त्यांनी आपली प्रतिक्रिया ऐका व्हिडिओ क्लिप द्वारे सोशल मीडियावर पोस्ट केली आहे प्रत्येक जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी हे आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून उच्च शिक्षित व कर्तव्यदक्ष अधिकारी यावे म्हणून पर्यत्न करत असतात परंतु परभणी जिल्ह्याचे दुर्दैवी म्हणावे लागेल की एक महिला कर्तव्यदक्ष आय ए एस जिल्हा अधिकारी म्हणून परभणी जिल्ह्याला भेटली होती आणि ह्या महिला जिल्हा अधिकारी परभणीत रुजू होण्यासाठी दाखलही झाल्या होत्या परंतु आपल्या मर्जीतल्या जिल्हा अधिकारी परभणीत असावे म्हणून सरकार च्या निकटवर्तीय लोकप्रतिनिधी ने राजकीय खेळी करून एका महिला आय ए एस अधिकाऱ्याला आपल्या पदाचा चार्ज न घेता वापस परतून जाण्यास भाग पाडले परभणी जिल्ह्याची जनता हे सर्व प्रकार उघड्या नजरेने आहात आहे परभणी जिल्ह्यात कर्तव्यदक्ष महिला जिल्हा अधिकारी नको का मग सरकारला वसुली अधिकारी हवे आहे का असा खडा सवाल आमदार बोर्डीकर यांनी उपस्थित केला आहे महिला आय ए एस आचल गोयल हे परभणी जिल्हा अधिकारी चा पदभार न स्वीकारता वापस गेल्यामुळे दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात हे प्रकरण चांगलेच पेटले असून उद्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close