Breaking News

राजकिय हेवे दवे मुळे प्रभाग क्रमांक ९ मधील विकास खुंठला,नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतुर (जनसमर्थक)जिंतूर नगरपालिका मधील प्रभाग क्रमांक 9 हे नेहमी राजकीय हेवेदावे मुळे या परिसरातील  नागरिकांना नहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याचे काम रखडले पिण्याचे पाणी या भागात आठ 10 दिवसाला येते अस्वच्छता मुळे या भागात नागरिकांचे हाल होत आहे या सर्व गोष्टीला कंटाळून या प्रभागातील टीका खान व परिसरातील नागरिकांनी प्रभाग क्रमांक 9 मधील मूलभूत सुविधा देण्यात यावे म्हणून मुख्यधिकारी यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे

येथील न. प. अंतर्गत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मंजूर झालेल्या विकास कामे तात्काळ सुरू करावी असे निवेदन मुख्याधिकारी यांना प्रभागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे
या प्रभागत संतोषीमाता मंदिर परिसर, करिमी मसजिद परिसर नूरानी कॉलोनी, सटवाई माता मंदिर परिसर ,मौलाना आझाद कॉलनी, परिसर मधील नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकणे गरजेेचा आहे या भागात पाणी १० ते २० दिवसाला येत आहे तेव्हा पिण्याचे पाणी रहिवाशी यांना कमतरता होत आहे करिमी मजीद परिसरातील महमूद भाई यांच्या घरापासून गफ्फार भाई यांच्या घरापर्यंतचा मंजूर सीसी रोड तात्काळ करावा गेल्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावरील नाली काम करण्यात आले होते पण सीसी रोडचे काम हेतुपुरस्कर केले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे 

या निवेदनावर प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते टीका खान पठाण, राधेश्याम वैष्णवी, सलीम चाऊस, करीमोद्दीन ,शम्मूभाई कटर,निसार भाई, मेहराज कुरेशी, आदींच्या स्वाक्षरी आहेत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close