Breaking News

*मराठवाड्याचा मानवी विकास निर्देशांक कमी आहे, तो उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू!* – अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

       

                संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- मराठवाड्याचा शैक्षणिक, आर्थिक, जलसिंचनाचा अनुशेष उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत प्रचंड आहे. मराठवाड्याच्या राजधानीची अवस्थाही तीच आहे. इथे राष्ट्रीय दर्जाच्या तीन संस्था आहेत. मात्र, येथील औषधी आणि वाहन उद्योगांचे प्रमाण लक्षात घेता आणखीन राष्ट्रीय, राज्यस्तरावरील संस्था स्थापन झाल्या पाहिजेत; तसेच प्रस्तावित संस्था सुरू होण्यासाठी शिक्षण हा विषय विकासाच्या अजेंड्यावर यायला हवा. राज्य दर्जाच्या संस्था एकट्या औरंगाबादेतच न एकवटता यापुढच्या काळात त्याचा विस्तार इतरही जिल्ह्यांमध्ये झाल्यास मराठवाड्याचा अनुशेष दूर करता येईल, तद्ववतच मराठवाडा मानवी विकास निर्देशांक नक्की वाढवता येईल असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी जन आशीर्वाद यात्रेत जिंतूर येथे काढले. याप्रसंगीभारतीय जनता पार्टी च्या वतीने काढण्यात आलेली जन आशीर्वाद यात्रा जिंतूर येथे आली असता आ सो मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली माऊली मंगलकार्यालय येथे जन आशीर्वाद सभा संपन्न झाली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार मा. नामदार डॉ.भागवतजी कराड, मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर, आमदार. तानाजी मुटकुळे, माजी आमदार मोहनभाऊ फड, जिल्हा अध्यक्ष सुभाष कदम,गणेशजी हाके, मा. आ. रामराव वडकुते, मा. आ. गोविंदअण्णा केंद्रे, यात्रा प्रमुख मनोजजी पांगारकर, प्रवीण घुगे , बापू घडामोडे, डॉ. गुलाब सांगळे,व्यंकटराव तांदळे, रबदडे मामा,रजनी पाटील, डॉ.विध्या चौधरी, बार्शीकर ताई, कार्यक्रम चे प्रास्ताविक आमदार मेघनादीदी यांनी केले. तर सुत्रसंचलन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पंडित दराडे यांनी केले तर. कार्यक्रम यशस्वीते साठी दत्ता कटारे, सुमेध सूर्यवंशी,हकीम भाई, रमेश मोहिते, युवराज घनसावंत, माधव दराडे, अमोल देशमुख,प्रवीण प्रधान, संतोष राठोड, सुनील घुगे, संदीप घुगे,निर्मला बांडे, संगीता जाधव, आदी भाजपा पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख , हजारो च्या संख्येने लोक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close