Breaking News

◆भारतीय स्टेट बँक च्या ग्राहकांना सन्मानजनक वागणूक द्या,,नागरिकांचे कामे वेळेवर करा,● नगरसेवक ऍड.गोपाळ रोकडे यांची राज्य अर्थमंत्री भागवतजी कराड भारत सरकार यांच्याकडे लेखी तक्रार,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

               संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूरात गेल्या अनेक दिवसा पासून भारतीय स्टेट बँक येथे नागरिकांना बँकेतील व्यवहार करते वेळेस अपमान जनक वागणूक देण्यात येते याबाबतची अनेक वेळा तक्रार करून सुद्धा व्यवस्थापक याच्या कडे दुर्लक्ष करत उलट व्यवस्थापक यांनी आपल्या दोन वाचमेन यांच्याकडून या बँकेतील ग्राहकांना हातात काठी देऊन लायनीत उभे राहण्यासाठी धमकावून अपमानजनक वागणूक दिलेजते याबाबत अनेक वेळा येथील व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार करून सुद्धा उपयोग होत नाही या कारणाने जन आशीर्वाद यात्रे निमित्त केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे जिंतूर येथे आले असता नगरसेवक ऑड. गोपाळ रोकडे यांनी या बँकेतील कामात अनियमितता व विविध कर्ज योजनेअंतर्गत कामांना प्रधान्य देऊन नागरिकांना सन्मानजनक वागणूक देण्याची मागणी एका नियोजनाद्वारे करण्यात आली आहे
या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की जिंतूर शहरातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एलदरी रोड व मेन रोड वरील तहसिल कार्यालय समोरील शाखा या तिन्ही शाखा मध्ये विद्यार्थी , वयोवृद्ध, महिला, पेन्शनर ,तसेच व्यापारी वर्ग आर्थिक व्यवहार करतात तसेच पीक कर्ज इतर शेती विषयक कामासाठी शेतकऱ्यांना या तिन्ही शाखेत रोज यावे लागते
दररोज बँकांशी संलग्न कामे वरील सर्वांची असतात त्यामुळे बँकेत गर्दी असते व या शाखेच्या बाहेर खूपच मोठ्या रांगा लागलेल्या असतात त्यात वयोवृद्ध महिला आजारी लोक हे तासंतास ताटकळत उभे असतात त्यांना बँक व्यवस्थापना कडुन कोणती मदत होत नाही ,याउलट बँकेच्या शिपाई ते व्यवस्थापक यांच्या कडून ग्रामीण भागातील शेतकरी व शहरी भागातील खातेदार याना उद्धट व अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यांना reserve बँकेने ठरवून दिलेल्या प्रमाणे कोणतीच सेवा देण्यात येत नाही..
तसेच मुद्रालोन, अण्णासाहेब पाटील महामंडळ ह्या केंद्र शासनाने योजना सुरू केल्या आहेत याची जाणीव जिंतूर शहरातील तिन्ही राष्ट्रीयकृत बँकांना राहिली नाही ,,
वरील दोन्ही शाखेत मुद्रालोन व अण्णा साहेब पाटील विकास महामंडळ लोण च्या फाईल धूळखात पडल्या आहेत त्यामुळं केंद्र सरकारच्या लाभदायी योजनेचा लाभ गरजू होतकरू तरुणांना व गरीब शेतकऱ्यांना भेटत नाही..
बँकेचे कर्मचारी केंद्र सरकारच्या योजनेचा बाबतीत उदासीन आहेत
कोणतीच माहिती अथवा मदत खातेधरकाना बँक अधिकारी व कर्मचारी करत नाहीत मुद्रालोन ही योजना बंद आहे असं उद्धट पणे सांगण्यात येत त्यामुळं सर्व नागरीक खुपचं त्रस्त आहेत..
म्हणून मुद्रालोन व अण्णा साहेब पाटील विकास महामंडळ च्या फाइल आवश्यक कागदपत्रे तपासून व होतकरू तरुण वर्गाला त्वरित मंजूर करून द्याव्यात तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक खातेदार ला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उद्धट व अपमानास्पद वागणूक बंद करून त्यांना व्यवस्थित बोलून सांगावे अशी अनेक वेळा तोंडी समज देऊनही बँकांच्या व्यस्थापणात काही बदल झाला नाही..
तरी मेहरबान साहेबांनी उपरोक्त गँभीर बाबींचा विचार करून सामान्य जनतेची व शेतकरी वर्गाची होणारी हेळसांड थांबवावी अशी विनंती ऍड. गोपाळ रोकडे नगरसेवक

    हे हि वाचा

          या तक्रारीसंदर्भात आमदार मेघना बोर्डीकर यांनी जन आशीर्वाद यात्रे निमित्त उपस्थित केंद्रीय राज्याचे अर्थमंत्री भागवत कराड यांना आपले प्रस्तावना मधून जिंतूर तालुक्यात भारतीय स्टेट बँकेचे कामात बाबत नेहमी तक्रारी येत असतात या बँकेतील ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात हि इतर ठिकाणी शाखा ओपन करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close