Breaking News

जिंतूरच्या भूमीपुत्राने लिहलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा,, मुबंईत निवृत्त नगरसचिव पठाण यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
 जिंतूर :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापनादिन व दीक्षांत समारंभाचे औचित्य साधत संस्थेच्या अंधेरी सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिंतूर शहराचे भूमिपुत्र औरंगाबाद येथील महापालिकेचे निवृत्त सचिव तसेच अ. भा.स्था.स्व. संस्थेचे मानद संचालक मेहबूब खान पठाण यांनी लिहिलेल्या “महापालिका कामकाज व सभा कामकाज पद्धती” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख, संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण,अजय साने,जयराज फाटक,राजीव अग्रवाल,अजय बोरास्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
जिंतूर शहरातील कसबा पेठ येथील रहिवासी असलेले महेबूब खा पठाण यांनी औरंगाबाद महापालिकेत नगर सचिव पदावर अनेक वर्षे सेवा बजावलेली असून केंद्रीय हज समितीवर उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ही त्यांनी काम केलेले आहे.त्यांना तांत्रिक आणि प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असून सध्या ते अ.भा.स्था.स्व.या
संस्थेचे मानद संचालक म्हणून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताहेत. तसेच नगर विकास कामाच्या संदर्भात सल्लागाराची भूमिका बजावत आहेत. महापालिका कामकाज सभा कामकाज पद्धती हे पुस्तक महानगर पालिकेत काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी संबंधी उपाययोजना व प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असून विविध कायद्यात व नियमात झालेल्या सुधारणा ची माहिती देखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. सभागृहाचे रितीरिवाज,संकेत, शिष्टाचार, प्रभावी लोकप्रतिनिधी होण्यास निकष आदी संबंधि अत्यंत उपयुक्त व एकत्रित माहिती या पुस्तकात आहे.विशेषतः पालिका सदस्य निवडीनंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने विविध कायद्यांतर्गत करावी लागणारी कार्यवाही बाबतही पुस्तकात उहापोह करण्यात आला आहे.या पुस्तकाची प्रस्तावना रंजीत चव्हाण यांनी लिहलेली आहे.त्यांच्या या यशा बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
हे ही वाचा
एम ए पठाण यांचा परिचय
जिंतूर शहरातील कसबा मोहल्ला येथे दि 07 जुलै 1957 रोजी त्यांचा जन्म झाला असून त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण शहरातच झाले असून महाविद्यालयीन शिक्षण परभणी येथील महाविद्यालयात, पदव्युत्तर पदवी डॉ बाबासाहेब आबेडकर विद्यापीठ औरंगाबाद,विधी पदवी नांदेड,औरंगाबाद तर दिल्ली विद्यापीठातून अर्बन अँड कंट्री प्लॅनिंग या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close