Breaking News

●अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत – पालकमंत्री नवाब मलिक,, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त परिस्थितीचा पालकमंत्री नवाब मलिक यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे आढावा,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी,दि,9 (जिमाका) : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करुन शासनास अहवाल सादर करावा असे निर्देश पालकमंत्री यांनी जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती संदर्भात आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित आढावा बैठकीत दिले.
यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजय भांबळे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा कृषि अधिक्षक व्ही. डी. लोखंडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, संबंधित विभागाचे विभाग प्रमुख, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थ्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले असुन यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. याकरीता प्रशासनाने या आपत्तीजन्य परिस्थितीस सर्वोच्च प्राधन्य देवून संवेदनशीलतने हाताळावी. तसेच मनुष्य किंवा पशुधनाची जिवितहानी झाली असल्यास संबंधीतांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्या भागात जिवितहानी, पशुधन, शेती व पिकांचे नुकसान झाले त्या भागाचे तात्काळ पंचनामे करावेत. 33 टक्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करावे. तसेच पंचनामे करतांना तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी विमा प्रतिनिधी व शेतकऱ्यांना सोबत घेवूनच पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी तहसिलदार व कृषि विभागास दिले. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी अतिवृष्टी व पुरपरिस्थ्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेवून शाळा, रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र व पुलांची झालेल्या नुकसानीची पाहणी करुन मदतीची मागणी मदत व पुनर्वसन विभागाकडे करावी. ज्या ठिकाणी पुलांवर पाणी आहे त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावावा कोणतीही जिवीतहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात पुरपरिस्तिमुळे पिण्याचे पाणी दुषीत होणार नाही. तसेच रोगराई पसरु नये याबाबत आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अतिवृष्टी व पुरपरिस्थिमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देतांना म्हणाल्या की, जिल्ह्यातील बहुतांश महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे आणि पुराचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे व जमीनीचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 व्यक्ती मयत तर 100 जनावरे दगावली असुन संबंधीतांना मदत देण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा पिकांच्या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop insurance हे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त फोटोसह अपलोड करावी किंवा 18001024088 या टोल फी क्रमाकांवर तक्रार नोंदवावी. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा किंवा तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह तक्रार नुसकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची नोंद करावी. सध्या पिकांचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे झाले असल्याने अतिवृष्टी हेच कारण नमुद करुन नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवितांना योग्य ती खबरदारी घेऊनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकासन तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्या भागात नुकसान झाले आहे त्या भागाचे सर्वेक्षण करुन अंदाजीत किती क्षेत्राचे नुकसान झाले आहे याची माहिती शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी विमा कंपन्याकडे पाठविली असल्याची माहिती ही यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.
-*-*-*-*-*-

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close