◼️पत्रकारास मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे सदस्य एम एजाज हे गेल्या काही दिवसापासून इनामी जमिनी बाबत वार्तांकन करत आहेत. एम एजाज हे जिंतूरच्या तहसील कार्यालयात मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळी सुनावणीसाठी गेले असता त्यांच्यावर प्रतिवादी व्यक्तींनी एकत्र येऊन तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात एम एजाज यांच्या डोक्याला व कमरेला गंभीर दुखापत झाली जिंतूर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले
जिंतूर येथील तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने बुधवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना या विषयी निवेदन देण्यात आले या निवेदनात सदर घटनेचा निषेध करण्यात आला या घटनेतील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात आली तसेच मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण व सचिव गुणीरत्न वाकोडे यांनी दिला आहे. या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण, सचिव गुणीरत्न वाकोडे, ज्येष्ठ पत्रकार एम ए माजिद, राजाभाऊ नगरकर, विरोद पाचपिल्ले, शेख शकील, निहाल अहमद, भास्करराव चौधरी, शेख वाजिद, शेख अलीम, सय्यद नसिर, बालाजी शिंदे,रत्नदीप शेजावळे, रफिक तांबोळी, रामप्रसाद कंठाळे, बाबर पठाण, शेख रहिम, गौतम मस्के,शंम्मू पटेल, शेख इफ्तेखार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे हि वाचा
*कठोर कार्यवाही करणार*
*-तहसीलदार मांडवगडे*
पत्रकारास मारहाण झाल्याची घटना गंभीर असून या प्रकरणात मी व्यक्तिशः लक्ष घातले असून आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे जिंतूरचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी सांगितले
हे हि वाचा
*…..तर आंदोलन करणार*
*-गजानन चौधरी*
*तालुका अध्यक्ष, पत्रकार संघ,जिंतूर*
लोकशाही राज्यात हुकूमशाही पद्धतीने झालेला हा हल्ला आहे आम्ही प्रशासनाकडे या प्रकरणाच्या अनुषंगाने काही मागण्या केलेल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही सर्व पत्रकार आंदोलन करणार आहोत, असे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी सांगितले