Breaking News

बूथ कमिटी पासून सर्व सेलच्या पदाधिकारी यांनी पक्ष वाढीस योगदान द्या – मा.ना.श्री जयंत पाटील

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

              संपादक :-अकबर सिद्दीकी

जनसमर्थक    जिंतूर :- २४ सप्टे. राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यानिमित्त मा.ना.श्री जयंत पाटील व मा.ना.श्री राजेश टोपे साहेब (सार्वजनिक आरोग्य मंत्री,महाराष्ट्र) यांनी आज लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय जिंतूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी मा.ना.फौजिया खान मॅडम (राज्यसभा खासदार), मा.ना.रुपालीताई चाकणकर मॅडम (प्रदेशाध्यक्षा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस), मा.महेबूब शेख (प्रदेशाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस), मा.नरेद्र काळे (प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस डॉक्टर राष्ट्रवादी सेल), मा.श्री सुनील गव्हाणे साहेब (प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस) ,मा.सक्षनाताई सलगर (प्रदेशाध्यक्षा युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस), मा.श्री बसवराज नागराळकर पाटील (पक्ष निरीक्षक परभणी जिल्हा), मा.जयसिंगराव गायकवाड (मा.खासदार), मा.सुरज चव्हाण (प्रदेश कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस), मा.आ.बाबाजानी दुर्राणी (विधानपरिषद सदस्य) मा.राजेशदादा विटेकर (माजी अध्यक्ष जि.प. परभणी), मा.सौ.भावनाताई नखाते(जिल्हाध्यक्षा महिला रा.कॉं.परभणी) श्री रितेश काळे साहेब(युवक जिल्हाध्यक्ष रा.कॉं.परभणी) इ.व्यासपीठावर उपस्थित होते.
त्यात मा.ना.श्री जयंत पाटील साहेब यांनी पक्ष बांधणीचा आढावा घेतांना मतदार संघातील एकूण बूथ, बूथ कमिट्या सर्व सेलचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद डोळ्यासमोर ठेवून नव्याने बूथ बांधणी करण्यात यावी. तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व सेलच्या पदाधिकारी यांनी तत्पर राहिले पाहिजे व कठीण समस्या सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असा संदेश दिला. तर शेतकऱ्यांच्या मालाचे बाजार भाव कमी करण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका देखील मा.ना.श्री जयंत पाटील साहेब यांनी केली.
मागील विधानसभेचा परवाभव जिव्हारी लागला असून येणाऱ्या विधानसभेत मा.आ.विजय भांबळे यांना कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहचण्याचा आपण निश्चय केला पाहिजे असा मोलाचा संदेश मा.ना.श्री जयंत पाटील साहेब यांनी सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. तसेच मा.रुपालीताई चाकणकर व सक्षाना सलगर, रितेश काळे, यांनी मार्गदर्शन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेक्षाताई भांबळे यांनी केले.
यावेळी मा.आ.विजयराव भांबळे साहेब,मनोज थिटे (ता.अ.रा.कॉं.जिंतूर), अजय चौधरी(उपाध्यक्ष जि.प.परभणी) प्रेक्षाताई भांबळे (जिल्हाध्यक्षा युवती परभणी) मा.रामराव उबाळे(समाज कल्याण सभापती जि.प.परभणी)जि.प.सदस्य बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, विठ्ठल घोगरे, विश्वनाथ राठोड, मा.राजेंद्र काका लहाने, अशोक नाना काकडे, बाळासाहेब रोडगे यांच्यासह मनीषाताई केंद्रे (महिला ता.अ.रा.कॉ.पा.जिंतूर) शौकत खां बरकत खां पठाण (शहराध्यक्ष रा.कॉं.), श्री माउली ताठे(तालुका अध्यक्ष रा.कॉं.सेलू),श्री गणेशराव इलग(सभापती प.स.जिंतूर) ,शरद मस्के (उपसभापती प.स.जिंतूर) मधुकर भवाळे, दिलीप डोईफोडे, किरण दाभाडे, विजय खिस्ते, मुन्जाभाऊ तळेकर, बाबाराव ठोंबरे, सुभाष घोलप, संतोष भवाळ, बाळासाहेब गायकवाड, प्रकाशराव शेवाळे, माणिकराव बहिरट, अमोल शेंगुळे, श्री चंद्रकांत उर्फ पप्पू गाडेकर(सभापती प.स.सेलू), ज्ञानदेव घुगे, सचिन डोंबे, गोरखनाथ भालेराव, पुरुषोत्तम पवाडे, आनंद डोईफोडे, सबिया बेगम कपिल फारुकी (नगराध्यक्षा न.प.जिंतूर), श्री बाळासाहेब भांबळे (उप-नगराध्यक्ष न.प.जिंतूर), शेख इस्माईल, दत्तराव काळे, उस्मान पठाण, लखुजी जाधव, श्यामराव मते, दलमीर पठाण, अहमद बागबान, शाहेदबेग मिर्झा, मनोहर डोईफोडे, बंटी निकाळजे, चंद्रकांत बहिरट, सोहेल सर यांच्यासह श्री सचिन बोबडे(युवक ता.अ.रा.कॉं.जिंतूर) ,हरभरे ताई, आशाताई खिल्लारे, कु.पुष्पाताई उबाळे(युवती शहराध्यक्षा जिंतूर शहर), श्री अजय डासाळकर (ता.अ.युवक रा.कॉं.सेलू) यांच्यासह सर्व प.स.सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तसेच सर्व सेलचे ता.अ.व पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close